कै.मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ शितलताई साबळे यांचे उध्या शंकरनगर येथे किर्तन

मोरे मनोहर
किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली येथील गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टचे माजी सचिव स्वर्गीय मधुकररावजी पाटील खतगावकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने दि.6 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता शंकरनगर येथे हभप शितलताई साबळे अहिल्यानगर यांचे किर्तन आणि इंडियन प्रीमियर लिगच्या धर्तीवर कै.मधुकरराव पाटील खतगावकर प्रिमियर लिगच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन प्राचार्य डी.पी.पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या या किर्तन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कै.मधुकरराव पाटील खतगावकर प्रिमियर लिगच्या आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या क्रिकेट स्पर्धेचे प्रथम बक्षीस 21000/ एकविस हजार रुपये, द्वितीय बक्षीस 11000/हजार रुपये आणि तृतीय 5000/पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असून या क्रिकेट सामन्यासाठी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील अनेक उत्कृष्ट खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत.
कै.मधुकररावजी पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर हे राहणार असून या प्रसंगी डॉ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, रवी पाटील खतगावकर ( सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली) तसेच आशिष पाटील खतगावकर यासह अनेक मान्यवर मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत या सामन्यांचे उदघाटन होणार आहे तरी परीसरातील क्रिकेट प्रेमी खेळाडूंनी तसेच परीसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोदावरी मनार पब्लिक स्कूलचे प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे यांनी केले आहे.