किनवटताज्या बातम्यानांदेड

गटविकास अधिकारी श्रीमती जयश्री वाघमारे यांनी दिल्या विविध गावांना भेटी…

New Bharat Times नेटवर्क

किनवट :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गटविकास अधिकारी श्रीमती जयश्री वाघमारे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत गोकुंदा, अंबाडी तांडा व लोणी या गावांना भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले.

सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास ध्येये २०३० च्या दिशेने ग्रामीण विकासाचा नवा अध्याय सद्या राज्यात सुरू आहे. हे अभियान पारदर्शक व तत्पर प्रशासन, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, शेती, पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, उपजीविका विकास आणी लोकसहभाग यांसारख्या ग्रामीण विकासाच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करणारे आहे.

याचाच एक भाग म्हणून गटविकास अधिकारी श्रीमती जयश्री वाघमारे यांनी गोकुंदा, अंबाडी तांडा आणि लोणी या गावांना अचानक भेट देऊन सदर मोहिमेशी संबंधित सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियांना अंतर्गत समावेशित कामे अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.

यात ग्रामीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सुरु असलेली कामे, शाळेत मुलींसाठी स्वछतागृह, अंगणवाडीस शौचालय व पिण्याच्या पाण्याची जोडणी, जलतारा शोषखड्डे संदर्भात प्रगती, रोजगार हमी योजना, डिजिटल रेकॉर्ड आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विशेष म्हणजे गटविकास अधिकारी यांनी राज्य आणि केंद्रशासनाच्या विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन लवकरच त्या सोडविण्यासाठी आपण आग्रही असल्याची बाब ग्रामस्थांसोबत केलेल्या चर्चेतून निदर्शनास आणून दिली.

यावेळी व्ही जे वाघमारे विस्तार अधिकारी, अरिफ शेक जिल्हा व्यवस्थापक पेसा, पांडुरंग मामीडवार आकांक्षित कार्यक्रम समन्वयक(नीती आयोग), अभिजित गरड तालुका व्यवस्थापक (आरजीएसए), इम्रान शेख, आकाश आडे तालुका व्यवस्थापक (पेसा), उत्तम खुडे प्रतिनिधी (टाटा मोटर्स), सरपंच जोत्स्ना कैलास जाधव(अंबाडी तांडा), अनुसया संजय सिडाम (गोकुंदा), बेबीताई भीमराव कुरसांगे (लोणी), ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण रावळे, नरेंद्र राठोड, ललिता वाळके, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत माहिती –
शासन निर्णयानुसार हे अभियान १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविले जातं आहे.
शासनाने ठरविलेल्या ०७ प्रमुख घटक- १.सुशासनयुक्त पंचायत, २.सक्षम पंचायत, ३.जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गांव, ४.मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, ५.गांव पातळीवरील संस्था सशक्तीकरण, ६.उपजीविका विकास व सामाजिक न्याय, ७.लोकसहभाग व लोकचळवळ ह्या घटकांवर गावातील कामाचे कार्यप्रदर्शन तपासून गुणांकन दिले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचे प्रभावी अभिसरण करून शेवटच्या घटकांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. या अभियानाचा मुख्य गाभा “सर्वाना सोबत घेऊन चला” असा आहे. हे एक अभियानच नसून गावच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करणारी ही एक जणू ग्रामविकासाची लोकचळवळ आहे. या अभियानामुळे प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल. “एकही गांव मागे राहणार नाही” हे अभियान यशस्वी करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिक, महिला, पुरुष, युवक, स्वयंसेंवी संस्था यांनी उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग देणे गरजेचे आहे.
श्रीमती जयश्री वाघमारे
गटविकास अधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker