आरोग्य पतसंस्था निवडणूक : मतदान विकत घेण्याची भाषा करणाऱ्यांना मतदार जागा दाखवणार

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : नांदेड जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेचा प्रचार टिपेला पोहोचला असून दोन पॅनल आपापली भूमिका मतदारांना पटवून देण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. काहीजण तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी लक्ष्मी दर्शन घडविण्याच्या तयारीत असल्याचे समजते. पण आरोग्य पतसंस्थेचा मतदार हा कर्मचारी वर्ग असुन सुज्ञ जाणकार आहे, कोणत्याही आमिषाला बळी पडणारा नाही. लाचारी तर अजिबात पत्कारणार नाही.
निवडणुकीत मतदारांना डोक्यावर घेणारे निवडणुकीनंतर पायदळी तुडवतात हा अनुभव मतदारांना आहे. आरोग्य पतसंस्थेचा कारभार पारदर्शीपणे राबविण्यासाठी कोण सक्षम आहेत, कोण घोटाळेबाज आहेत हे मतदार जाणतो. मतदारांची जमापुंजी कोणाच्या हाती सुरक्षित राहणार आहे हे ठरवण्यासाठी हि निवडणूक निर्णायक ठरणार आहे.
आज लक्ष्मी दर्शन घडवणारे उद्या आपली जमापुंजी सुरक्षित ठेवतील काय? याचा विचार आरोग्य पतसंस्थेच्या मतदारांना करणे आवश्यक आहे. आरोग्य पतसंस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता पतसंस्थेच्या हितासाठी, पतसंस्थेच्या उत्कर्षासाठी योग्य पॅनलला निवडुण देवुन पतसंस्थेचा विकास साधावा अशी मतदारांची भावना आहे.
जिल्हा परिषद आरोग्य पतसंस्थेच्या निवडणुकीत तोतयेगीरी, गुंडागर्दी, तळीरामाचा उच्छाद, भ्रमणध्वनीचा गैरवापर अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मा.जिल्हा पोलिस अधीक्षक यांना परिवर्तन पॅनलच्या वतीने निवेदन देऊन पोलिस संरक्षणाची मागणी करताना परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी केली आहे.