ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी नगरपालिका पथविक्रेता समितीच्या सदस्यपदी पार्वती बुडावार, अनिल गायकवाड व मोईज शेख यांची बिनविरोध निवड

कुंडलवाडी प्रतिनिधी :- कुंडलवाडी नगरपालिका पथविक्रेता समितीच्या सदस्य पदाकरिता चा आरक्षण सोडत कार्यक्रम १२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले होते. पतविक्रेता समितीच्या ८ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते व नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज दि.१६ ऑगस्ट अखेरच्या दिवशी तीनच अर्ज आल्याने तिनही जणांची बिनविरोध निवड झाली आहे.तर उर्वरित पाच जागांवर कोणीही अर्ज दाखल करण्यात आले नसल्याने रिक्त आहेत.

पथविक्री उपजीविकास संरक्षण व पथविक्री विनीयमअधिनियम २०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण पथविक्री विनियम ) नियम २०१६ नियम १४(२) अन्वये पथविक्रेता सदस्यांच्या निवडणुका कार्यक्रम २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम नुसार आज १६ आँगस्ट रोजी नगरपरिषद कुंडलवाडी जिल्हा नांदेड निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार आर.जी.चौहान यांच्या निवडणूक कक्षात एकूण ३ अर्ज प्राप्त झाले.

नगर पथविक्रेता समितीच्या पथविक्रेत्यामधून निवडूण येणा-या सदस्य पदाकरिता १२ आँगस्ट रोजी नगरपालिका कार्यालयात आरक्षण सोडत उपस्थित नागरिकांसमोर वेदांत बालाजी येमेकर व वैभव शंकर मरकंटेवार यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठया टाकून काढण्यात आले.

यात खालीलप्रमाणे क्रमशः दोन जागेचे आरक्षण निश्चीत करून पुढीलप्रमाणे आरक्षीत म्हणून घोषीत करण्यात आले अनुसूचित जाती -०१ (महिला आरक्षित)अल्पसंख्याक ०१सर्वसाधारण,अनुसूचित जमाती ०१ (महिला आरक्षित), विकलांग व्यक्ती- ०१ सर्वसाधारण, इतर मागासवर्ग ०१ सर्वसाधारण आणि खुला प्रवर्ग- सर्वसाधारण ०२, महिला आरक्षित – ०१ वरील आरक्षणानुसार कुंडलवाडी नगरपलिका पथविक्रेता समीतीचे एकूण (०८ ) सदस्य पदाचे निवडणूकीकरिता आरक्षण जाहीर करण्यात आले होते.

यापैकी सर्वसाधारण महिला मधून पार्वती साईनाथ बुडावार यांचा तर सर्वसाधारण पुरुष मधून अनिल दिगंबर गायकवाड व शेख मोईज शेख महमद यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आर.जी.चौहान, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष निरावार अधिक्षक शांताबाई शिंदे, शंकर जायेवार, मारोती करपे, यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker