नरसीत रामजन्मोत्सवानिमत्त भव्य शोभायात्रा

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नरसी येथे रामनवमी निमित्त जय श्रीरामच्या जयघोषात प्रभु श्रीराम व पवनपुत्र हणुमान मुर्तीची भव्य शोभा यात्रा बुधवारी सायंकाळी काढण्यात आली. या जन्मोत्सव सोहळ्याच्या शोभायात्रेत राम भक्तांचा प्रचंड उत्साह दिसून आला. भरपावसात हजारो राम भक्त जय श्रीरामच्या घोषणांनी नरसी परिसर दुमदुमून गेला.

नरसी जुन्या गावातील श्रीराम मंदिरात दुपारी अडीच वाजता भाजपाचे जिल्हासरचिटणिस श्रावण पाटील भिलंवडे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पा.भिलवंडे, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे, ए.पी.आय.श्रीधर जगताप, रामकिशन महाराज राजेलवाड, मंजु महाराज जोशी, सरपंच गजानन भिलवंडे, अंकुश खनपट्टे, राम खनपट्टे, माधव कोरे, शाम चोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करुन रॅलीला जुन्या गावातुन सुरुवात करण्यात आले. या शोभायात्रेत युवकांनी हनुमान वेष धारण केलेले वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

शहरात मिरवणूक चालू असतानाच अचानक वादळीवाऱ्यासह पाऊसाची सुरुवात झाली परंतु श्रीराम भक्तांनी आजुबाजुला न जाता राम नामाचा जयघोष करीत तल्लीन होऊन नाचत होते. मिरवणूकीत ठिकठिकाणी खिचडी वाटप, मठ्ठा वाटप, पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.यावेळी या मिरवणुकीत सामाजिक एकोप्याचे अनुभव पाहायला मिळाला.

नरसीच्या जुन्या गावातील श्रीराम मंदिरात आरती करुन सुरुवात करण्यात आलेली रथ यात्रा मुख्य रस्त्यावरून नरसी चौकातून बालाजी मंदिर येथे नेण्यात आले तेथे आरती करून पुन्हा नरसी चौकातून बिलोली रोडवर असलेल्या दत्त मंदिरा समोर आरती करून रात्री ९.१० वाजता शोभायात्रेची सांगता करण्यात आली.
रामजन्मोत्सव रथ यात्रा सोहळा पाहण्यासाठी अनेक तालुक्यातील राम भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती यावेळी महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय होती.
रामजन्मोत्सवाला मोठा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांनी घेतली. देगलुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे श्रीधर जगताप, मरखेल चे स.पो.नि.संकेत दिघे, बिलोलीचे स.पो.नि.बाबासाहेब नरोटे, कुटूंर चे स.पो.नि.रामकृष्ण पाटील यांच्यासह नांदेड येथून दंगल नियंत्रण पथकला सुद्धा पाचरण करण्यात आले होते. रामतीर्थ ठाण्याचे सपोनि श्रीधर जगताप यांनी बदोबस्ताचे नियोजन व्यवस्थित पार पाडले.
या रथ यात्रेत भाजपा जिल्हासरचिटणिस, श्रावण पाटील भिलवंडे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षभास्कर पा.भिलवंडे, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे हे सामिल झाले होते.
सदर शोभायात्रेसाठी समितीचे प्रमुख अंकुश खनपट्टे, अनिल सावकार सिरमवार, पपू आक्कमवाड, राम खनपट्टे, सोमेश शेटकर, परविन पाळेकर, सतीष गौड, पांडुरंग खनपट्टे, सतीश गणगोपलवाड, नारायण सावकार, प्रदीप महाराज जोशी, दिपक तळणीकर, किरण खनपट्टे, व्यंकट नागेश्वर, माधव कोरे, मारोती बुक्के, प्रशांत शिरगिरे, बाजीराव मेटकर, शिवा मेटकर, साईनाथ बरगे, सतीष गौड, रमेश वासरे, त्र्यंबक डाके, साईनाथ बोडके, विशाल बडूरे, संतोष मांजरमे, माधव वडगावे आदिनी या शोभायात्रेसाठी परिश्रम घेतले. सदर शोभायात्रा ही शांततेत पारपाडण्यासाठी गावातील युवकांनी ही परिश्रम घेतले.