ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

दोन गटात तलवारी, खंजर आणि रॉडने हाणामारी : अवैध वाळू वाहतुकीच्या कारणावरून झाला राडा

New Bharat Times नेटवर्क

मुखेड : मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे भरदिवसा रस्त्यावर युवकांच्या दोन गटात तलवारी, खंजर आणि रॉड ने हाणामारी झाली. दोघांची बोटे तुटली, एकाच्या डोक्यात तलवार लागली या हल्ल्यात तीघे जखमी झाल्याची माहिती समजली आहे. सदरचा राडा हा अवैध्य वाळू वाहतुकीच्या प्रकरणातून शुक्रवारी सकाळी घडल्याची माहिती आहे. चक्क रस्त्यावर तलवारी, खंजर, रॉड हातात घेवून दहशत निर्माण करत असलेला युवकांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या फ्री स्टाईल तलवार बाजीने चांडोळा येथे दहशत निर्माण झाली आहे.

चोरीची अवैध वाळू व ओव्हरलोड वाळू मुखेड मार्गे लातूर सोलापूरकडे जात असताना दोन तीन दिवसापूर्वी महसूल विभागाने कारवाई केली होती. तरीही अवैध वाळू वाहतूक काही थांबण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे अवैध वाळूची वाहतूक करणारा हायवा काही तरुणांना कट मारला यात मोटारसायकलवरील तरुण खाली पडले. यानंतर दुचाकी स्वारांनी परत येऊन चांडोळा टी पॉईंट वर त्या टिप्पर चालकास जाब विचारत असताना टिप्परच्या मागे चालत असलेल्या क्रेटा व आय ट्वैंटी कार मधील काही तरुण त्या ठिकाणी आले व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले व यात लाठी काठ्या व तलवारीने मारहाण झाली.

चक्क दिवसा आणि तेही रस्त्यावर हा तलवारी, खंजर लाठ्या काठ्यांनी एकदुसऱ्यावर हल्ला चढवल्याची घटना घडली यात तिघे जखमी झाल्याची माहिती समजली. झालेल्या राड्याची वाच्यता वाऱ्यासारखी पसरल्याने एकच चर्चेला उधाण आले. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शहरात दाखल झाले असून त्यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान सायंकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. वाळू माफियांच्या या फ्री स्टाईल हाणामारीने शहर व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफीयांना महसूल व पोलीस विभागाचे पाठबळ मिळत असल्याने माफीयांची मुजोरी वाढली असल्ल्याने त्यांची चक्क तलवारी व खंजरने हल्ला करण्यापर्यंत हिम्मत वाढली असल्याचा आरोप होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker