ताज्या बातम्यानांदेडनायगांव

अमरावती एसीबी ची नांदेडात कारवाई ; देगलूर येथे मोटार वाहन निरिक्षकासह खाजगी एजंट अडकला सापळ्यात

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : पाचशे रुपयाची लाच घेतांना आर टी ओ सिमा तपासणी नाका देगलूर येथील मोटार वाहन निरिक्षकासह एका खाजगी एजंटला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सदरची सापळा कारवाई दि. 25 सप्टेंबर रोजी करण्यात आली असून या प्रकरणी अकोला येथील ट्रान्सपोर्ट मालकाने तक्रार दिली होती. नांदेडात येवून अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असल्याने वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.

सध्या नांदेड देगलूर मार्गावर आर टी ओ सह महामार्ग पोलिसांनी वाहन चालकांना सळो की पळो करुन सोडले आहे. रात्री बे रात्री वाहणे अडवून लुट केल्या जात आहे. या दोन यंत्रणेमुळे हतबल झालेले वाहण चालक आर टी ओ व महामार्ग सुरक्षा पोलीसांच्या कुळाचा उध्दार करत आहेत. बरबडा फाटा येथे तर अनेकवेळा वाहण चालकांनी रात्रीला वाहण अडवण्याच्या प्रकारामुळे महामार्ग पोलीसांना प्रसाद दिल्याचीही चर्चा असून निर्लज्ज महामार्ग पोलीस पुन्हा लुट करण्याच्या कामात व्यस्त आहेत पण एक मोटार वाहन निरिक्षक आणि खाजगी एजंट मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्याने आरटीओ विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

अकोला येथील एका ट्रान्सपोर्ट मालकाचे ट्रक देगलूर मार्गे जातात. परंतु सिमा तपासणी नाका देगलूर येथील मोटार वाहन निरिक्षक अमोल धर्मा खैरनार, वय- 42 वर्षे यांनी एका खाजगी एजंटामार्फत अडवणूक करुन नेहमीच लुट करत होते. दि. 24 सप्टेंबर रोजीही ट्रक अडवण्यात आला व कागदपत्राची तपासणी करण्यात आली पण कागदपत्रे बरोबर असतानाही पैशाची मागणी केली. लाच द्यायची मानसिकता नसल्याने अकोला येथील संबधीत ट्रान्सपोर्ट मालकाने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दिलेल्या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर दि. 25 सप्टेंबर रोजी सापळा लावण्यात आला.

कार्यवाही दरम्यान देगलूर येथील आरटीओ चेक नाक्यावरील खाजगी एजंट गोपाळ इंगळे यांनी पंचा समक्ष व अमोल खैरनार मोटार वाहन निरीक्षक देगलूर चेक पोस्ट यांच्या उपस्थितीत तडजोडी अंती 500 रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याने तसेच आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान 500 रु पंचासमक्ष व अमोल खैरनार मोटर वाहन निरीक्षक देगलूर चेक पोस्ट यांच्या समक्ष लाच रक्कम स्वीकारल्याने वर नमुद अमोल खैरनार व खाजगी इसम गोपाल इंगळे यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले.

सापळा कार्यवाही दरम्यान खैरनार यांच्या कार्यालयातून रोख रक्कम 63820 रुपये मिळून आल्याने त्याबाबत खैरनार यांच्याकडे नमूद रकमेबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्यांनी योग्य समाधान कारक उत्तर दिले नाही तसेच सदर रकमेबाबत कॅशबुक रजिस्टर ला कोणत्याही कायदेशीर नोंदी दिसून आल्या नाही. त्यामुळे नमूद रक्कम पंचासमक्ष पुढील तपास कामी जप्त करण्यात आली आहॆ. तसेच त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन देगलूर जि. नांदेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker