श्रीनगर भागात रस्त्याची दुर्दशा, तसेच घाणीचे साम्राज्य…

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड अंतर्गत शहराच्या मध्य भागात असलेल्या श्रीनगर भागात, हनुमान मंदिर रोडच्या लगत असलेल्या रफाया मस्जिद समोरील रस्ता येथील ड्रेनेज पाईपलाईनचे नवीन काम, तसेच रस्त्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून चालू असून, काम कमी आणि तेथील नागरिकांना त्रास जास्त सहन करावा लागत आहे.

गेल्या दीड महिन्यापूर्वी चालू झालेले काम फक्त ड्रेनेज पाईपलाईन टाकून रस्ता तसाच खड्डेमय ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच श्रीनगर भागात नांदेड वाघाळा मनापा कडून दररोज कचरा उचलल्या जात नाही. त्यामुळे सगळीकडे घाणिचे साम्राज्य पसरले आहे.

घाणीमुळे नागरिकांना अनेक आजाराने घेरले आहे गॅस्ट्रो, मलेरिया यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे नागरिका तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात नांदेड वाघाळा महानगरपालिकाचे कामाकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

तरी नांदेड वाघाळा महानगरपालिका लक्ष घालून सदरील काम लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अखिल भारतीय महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षा सौ. नाज़ शेख यांनी लेखी निवेदनाद्वारे नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त यांना निवेदन दिले.
या वेळी श्रीनगर भागातील महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.