सोनू दरेगावकर यांचा प्रामाणिकपणा ; गहाळ झालेला मोबाईल विद्यार्थ्यांनीला केला परत

New Bharat Times नेटवर्क
नायगाव : जात पडताळणी विभागातील सोनू दरेगाकवकर या सह्रदयी व्यक्तीला जात प्रमाणपत्र पडताळणीच्या कामासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यांनीचा मोबाईल सापडला. पण त्यांनी तेवढ्याच तत्परतेने संपर्क साधून सापडलेला मोबाईल परत केल्याने त्या विद्यार्थ्यांनीने अतिशय भावूक नजरेने आभार मानत मोबाईल घेतला.
मोबाईल हा मानवी जीवनातील एक घटक बनलेला आहे. आणि मोबाईल जर आपल्या कडून गहाळ झाला तर माणूस हा खूप निराश बनुन जातो. आणि तो मोबाईल परत मिळेल का याची त्याला खात्री सुद्धा नसते. बी. फार्मसी मध्ये शिकत असलेली अर्पिता अविनाश भंडारे ही जात पडताळणीच्या कागदपत्रांच्या जुळवाजुळीत जात पडताळणीची फाईल सादर करून तो मोबाईल विसरून गेली.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथील कर्मचारी सोनू दरेगावकर यांच्या प्रामाणिकपणामुळे त्या विद्यार्थ्यांचा मोबाईल परत करण्यात आला. विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये झालेल्या निराशाजनक वातावरणात त्यांना त्यांचा मोबाईल परत मिळालेल्या आनंददायी आणि समाधान वातावरण निर्माण झाले. सोनू दरेगावकर यांच्या प्रामाणिकपणामुळे विद्यार्थ्यांचा मोबाईल परत मिळाला आहे हे विशेष.