ताज्या बातम्यानांदेडबिलोली

हुनगुंदा ते संगम रोडवर कुंडलवाडी पोलीसांनी अवैध वाळू वाहतुकीचा ट्रँक्टर पकडला ◆३ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कुंडलवाडी :- शहरापासून जवळच असलेल्या हुनगुंदा ते संगम रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रँक्टर दि.१४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता कुंडलवाडी पोलिसांनी पकडले असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी ‘दै.सामना’शी बोलताना दिली आहे.

कुंडलवाडी शहरापासून जवळच असलेल्या मांजरा नदी पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीर रित्या शासनाचा महसूल बुडून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकाँ माधव पाटील, रामेश्वर पाटील, रघुवीरसिंह चौहान, होमगार्ड लिंगुराम गुरूपवार, ईश्वर राठोड, सय्यद अली, यलमले गंगारेड्डी, ऋत्विक दासरे यांंनी दि.१४ फेब्रुवारी रोजी रोजी पहाटे ४ वाजता हुनगुंदा ते संगम रोडवर अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रँक्टर क्रमांक एम.एच.२६ व्हि.७५१२ वर कारवाई केली.

या कारवाईत ३ लाख रुपयाचे ट्रॅक्टर व ७ हजार ५०० रुपयांची वाळू असा ३ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालक बबलू मौलासाब शेख (रा.हुनगुंदा) याच्या विरुद्ध कुंडलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker