कुंटूर तांडा येथे 29 सप्टेंबर रोजी भटके-विमुक्तांसाठी हक्क व विशेष अभियानांतर्गत 22 प्रमाणापत्राचे वाटप

अंकुशकुमार देगावकर
नायगांव :- महाराष्ट्र शासन महसूल विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या अभियानांतर्गत भटके विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष शिबिर दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी माध्यमिक आश्रम शाळा कुंटूर तांडा, ता. नायगांव (खै.) जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. शासनाच्या योजना तुमच्या दारी हक्कांसाठी एक पाऊल पुढे या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

या शिबिरात उपलब्ध सुविधा-सेवा…
आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आयुष्मान भारत कार्ड, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना व इतर शासकीय योजना व प्रमाणपत्रे (लॉग-न-गझेट सेवा) वाटप करण्यात आले सदरील शिबिर महसूल विभागामार्फत आयोजित करण्यात आले होते तहसीलदार डॉ धम्मप्रिया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले होते.
कुंटुर मंडळातील मंडळ अधिकारी आर के पवार, सहाय्यक महसूल अधिकारी अर्चना दराडे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी मुधळे, पवन कदम, बाबू डाकेवाड, गोविंद काळे तसेच श्री शिक्षण प्रसारक मंडळ कुंटूर तांडा चे अध्यक्ष बालाजी पवार व ओ.बी.सी अशासकीय सदस्य डॉ विलास पवार, प्रेमानंद शिंदे तसेच कुंटूर येथील सेतू संचालक अडकिने पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या कार्यकची माहिती व मार्गदर्शन आर के पवार मंडळ अधिकारी कुंटूर यांनी केले यशस्वी रित्या शिबिर पार पडले



