क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळे जिल्हा परिषदेतील महिला अधिकाऱ्यास 2 लाखाची लाच घेतांना केले एसीबीने अटक

New Bharat Times नेटवर्क

धुळे : थकीत वेतन व 7 व्या वेतन आयोगाचा तीसरा व चौथा हप्ता तक्रारदार व त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यासाठी मिनाक्षी भाऊराव गिरी, अधिक्षका, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद धुळे तथा अधिक्षका (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांनी 2 लाखाची लाच मागितली आणि लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे धुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार व त्यांची पत्नी हया महानगरपालिका हायस्कुल, धुळे येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट शासनाच्या शालेय शिक्षण व किडा विभागाच्या दि. 30 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल 2022 ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीतील थकीत वेतन तसेच 7 व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजुर होवुन मा. शिक्षण संचालक, पुणे यांनी सदरचे थकीत वेतन अधिक्षक (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांच्या खात्यात जमा केले होते.

सदरचे थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी श्रीमती मिनाक्षी गिरी, अधिक्षका (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांची त्यांच्या कार्यालयात जावुन भेट घेतली होती. परंतु त्यांनी हया ना त्या कारणाने तक्रारदार व त्यांच्या पत्नीस त्यांचे थकीत वेतन अदा केले नाही. त्यांनतर सुमारे 15 ते 20 दिवसापुर्वी तक्रारदार यांनी श्रीमती मिनाक्षी गिरी, अधिक्षीका यांची त्यांचे कार्यालयात जावुन त्यांना सदरचे थकीत वेतन अदा करणे बाबत विनंती केली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 लाख लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, धुळे येथे आज दि. 20 आँगस्ट 2024 रोजी समक्ष येवुन तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची दि.20 आँगस्ट रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान अधिक्षीका श्रीमती मिनाक्षी गिरी यांनी तक्रारदार यांचेकडे 2 लाखाच्या लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याने आज रोजी त्यांचेवर सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पो. स्टे.जि.धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker