माझा राजकीय वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी डॉ. मिनल ची – माजी खा.भास्करराव खतगावकर
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक निवडणुका जिंकल्या, अनेकांना जिंकून आणलो पण कुणाच्याही दारात काहीही मागण्यासाठी गेलो नाही. माझी एकच इच्छा आहे की माझा राजकीय वारसा डॉ. मिनल ने पुढे न्यावा व आपणही साथ द्यावी अशी भावनिक साद माजी खा. भास्करराव खतगावकर यांनी कार्यकर्त्यांना घातली.
काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काल दि.12 सप्टेंबर रोजी भास्करराव खतगावकर यांनी शंकरनगर येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद बैठक आयोजित केली होती. यावेळी ते काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यांनी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे सांगितले असून लोकसभेसाठी दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा.रवींद्र चव्हाण यांना पाठींबा तर नायगाव विधानसभेसाठी डॉ.मिनल खतगावकर यांना मैदानात उतरवण्याचे ठरले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा इतिहास सांगितला.
मी राजकारणी असलो तरी एक हिंदू आहे. आणि याचा मला अभिमान देखील आहे.परंतु आमदार, खासदार झाल्यावर मी हिंदू नाही. माझ्या घरी मी धर्म पाळेल पण सामाजिक काम करताना नाही. सामाजिक काम करताना मला सर्व धर्म मला समान आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मी सर्व धर्मियांना सोबत घेऊन आजपर्यंत काम केलं. त्यामुळे कुठल्याही निवडणुकीत उमेदवार निवडून आल्यावर तो कोण्या जातीचा नसला पाहिजे तर तो बाबासाहेबां नी लिहिलेल्या घटनेवर प्रेम करणारा असला पाहिजे देशाच्या संविधानावर प्रेम करणारा असला पाहिजे.
संवाद बैठकीच मैदान हे माझ्यासाठी लाभदायी आहे कारण याच ठिकाणी जितेश अंतापुरकर यांनी 40 हजाराची लिड मिळणार असल्याचे सांगितले होते. आगामी काळातही डॉ.मीनल खतगावकर या नायगाव मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असाही आशावाद माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांनी व्यक्त केला आहे. मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक निवडणुका जिंकल्या, अनेकांना जिंकून आणलो पण कुणाच्याही दारात काहीही मागण्यासाठी गेलो नाही. माझी एकच इच्छा आहे की माझा राजकीय वारसा डॉ.मिनल ने पुढे न्यावा व आपणही साथ द्यावी अशी भावनिक साद माजी खा.भास्करराव खतगावकर यांन कार्यकर्त्यांना घातली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू गंदिगुडे यांनी केले तर प्रा.जिवन चव्हाण, डॉ.रत्नाळिकर, भिमराव जेठे, कु.भावना दासेटवाड, संभाजी पाटील शिंदे,बाळु मुदखेडे, गणपतराव पाटील धुपेकर, नागनाथराव अनंतवाड, शेख गौस रामतीर्थकर,दिंगाबर हजारे, मेहताप पठाण, मारोती पटाईत, गंगाधर गायकवाड मोकळीकर, आनंदराव बिराजदार गुरुजी, साईनाथ सोमठानकर यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.