ताज्या बातम्यानांदेडराजकारण

भाजपकडून लोकसभेसाठी मारोतराव कवळे यांच्या नावाची चर्चा

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : भारतीय जनता पक्षाला पोटनिवडणुकीत सक्षम उमेदवार दिले तर लोकसभेची पोकळी भरून निघेल. त्यासाठी पर्याय म्हणून नायगाव विधानसभेतील उद्योजक मारोतराव पाटील कवळे गुरूजी एकमेव उमेदवार म्हणून ओळख जिल्हात उद्योजक म्हणून परिचित आहेत असे सर्व सामान्य जनतेच्या तोंडून नाव पुढे येत आहे.

परवा लोकसभा निवडणूक झाली. काॅग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार माजी आमदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण हे बहुमताने निवडूण आले. काळाने आघात करत वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. आता लोकसभेची जागा रिक्त असल्याने पुन्हा पोटनिवडणुक होणार असुन काॅग्रेस पक्षाकडून स्वर्गीय खा.वसंतराव चव्हाण यांचे सुपूञ प्रा.रविंद्र चव्हाण यांचे नाव पुढे येत असल्याने यांना तोडीसतोड माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू सर्मथक म्हणून बहू परिचित असलेले नायगाव विधानसभेतील सक्षम उमेदवार उद्योजक मारोतराव पाटील कवळे गुरूजी हेच भाजप पक्षाकडुन सक्षम उमेदवार असुन हेच विजयाचे शिल्पकार ठरु शकतात असे जिल्हात भाजप पक्षांच्या गोटातुन चर्चा पुढे येत आहे.

कवळे गुरूजी यांनी मराठवाड्यातील नामवंत उद्योजक असल्याने भागात गुळपावडरचे दोन व एक साखरेचा कारखाना असे तिन कारखाने उभे करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिलेच. भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाला उंच्चाकी भाव देऊन सक्षम काम केलेच व्यापारपेठ वाढवले, ऐवढेच नाहीतर कै व्यंकटराव पाटील कवळे पतसंस्थेच्या माध्यमातुन जिल्हात विस शाखा काढुन सहकाराच्या माध्यमातून अनेकांना उद्योगाला मदतीचा हात दिले यामुळे जनतेच्या सहवासातून चांगले व्यक्ती म्हणून चर्चेत आहेत. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार आधीना न्याय आपल्या उद्योगातून दिल्याने जिल्हात विकासात्म दूरदृष्टी नेता भाजप पक्षाकडे असल्याने आयते भाजप पक्षाला स्वच्छ मनाचा चारित्र्यवान उमेदवार असल्याने असा काम करणाराच उमेदवार भाजप आवडतो अशी चर्चा पक्षाकडून ऐकावयास येत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तोडीसतोड आणी काॅग्रेस पक्षाला जड जाणारा उमेदवार आहे असे ही जनतेतुन चर्चा पुढे येत आहे.कवळे गुरूजी हे पेशाने शिक्षक त्यामुळे सर्वगुणसंपन्न सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणारा नवा चेहरा मारोतराव कवळे गुरूजी एकमेव पक्षाला पर्याय भाजप पक्षाला उपलब्ध आहे.तसे मारोतराव कवळे गुरूजी हे राजकारणात नवीन नसुन यापुर्वी नांदेड जिल्हा परिषद सदस्य पदी निवडुण येऊन उमरी,धर्माबाद व नायगाव तालुक्यातील गावा गावात विकास कामे केले.तसे उमरी बाजार समिती मध्ये बराच काळ उपसभापती ,सभापती काम केले.

२०१९ ची विधानसभा निवडणूक लढविली होती जिल्हात माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण साहेब यांचे एकमेव विश्वासू कार्यक्रत्य म्हणून ओळख जिल्हात परिचयाचे आहेत.
अशोकराव चव्हाण हे भाजप पक्षात प्रवेश केले.तेव्हा त्याच्या विश्‍वासाने त्याच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खा.अशोकराव चव्हाण व राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून मुबंई येथील भारतीय जनता पक्षांच्या प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश केले.मागील झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा प्रचार करण्यासाठी आख्खा जिल्हा पिंजून काढले होते.

समाजकारण, राजकारण, सहकार आधी काम कसे करावे हि ओळख जिल्हात कवळे गुरूजी यांच्याकडून शिक्षण घेण्याजोगे आहे.असाच विकासात्मक चेहरा भाजप पक्षाला हवा असल्याने कदाचित जिल्हात पुन्हा लोकसभेची भाजप पक्षाची सीट लागु शकते अशी चर्चा जिल्हातील भारतीय जनता पक्षाकडून कवळे गुरूजी चे नाव पुढे येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker