भेदभाव न करता ‘सरसकट’ अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे – प्रा.रवींद्र चव्हाण
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : कौटुंबिक दुखातून सावरत प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण हे लोककार्यासाठी सरसावले असून. नांदेड लोकसभा क्षेत्रातील सर्व महसूल मंडळामध्ये पाहणी करून सरसकट अतिवृष्टी अनुदान मंजूर करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने चव्हाण परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला होता पण या दुखातून सावर वसंतराव यांचे सुपूत्र प्रा. रवींद्र चव्हाण हे जनतेच्या सेवेसाठी सरसावले आहेत. त्यांनी शुक्रवारी (ता.१३) रोजी जिल्हाधिकारी आभिजित राऊत यांची भेट घेवून एक निवेदन दिले आहे. यात मागील आठवडयात नांदेड लोकसभा क्षेत्रा अंतर्गत् सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असल्याने शेतीचे मोठ्या नुकसान झाले आहे.
त्या अनुषंगाने महसूल मंडळ निहाय पाहणी अहवाल आपल्या स्तरावर तयार करण्यात येत असून. शेतकऱ्यांचे सरसकट नुकसान झाले असतांना कांही गांवे, विभाग, मंडळे वगळण्यात येत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांडून करण्यात येत आहेत.
अशा पध्दतीने पंचनामे होत असतील तर ते शेतकऱ्यावर अन्याय असून असे होवू नये म्हणून प्रत्यक्षपणे झालेल्या नुकसान ग्रस्त गावांची पुन: पाहणी करून सरसकट नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत सुचना संबंधीतांना देण्यात याव्यात. निसर्गाच्या अवकृपेने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अर्थिक मदत मिळवून द्यावी अशी आग्रही मागणी केली आहे.
यावेळी दत्ता येवते, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय बेळगे, बाबासाहेब शिंदे, बालाजी शिंदे, श्रीनिवास गडपल्लेवार यांची उपस्थिती होती.