ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे शहरात पथसंचलन

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपालिकेची निवडणूक दि.२ डिसेंबर रोजी होणार असून या पार्श्‍वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथील सहायक पोलीस आयुक्त वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुंडलवाडी पोलिसांनी शहरातील विविध मार्गावर दि.२९ नोव्हेंबर रोजी शहरातील विविध भागातून पथसंचलन करण्यात आले आहे.

या पथसंचलनात हिंगोली येथील राज्य राखीव दलाचे पोलीस उपनिरीक्षक कवडू ठोंबरे, कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक गफुर शेख, पोहेकाँ पी.आर.मेडेवार, आनंद बोडके, रविंद्र देशमुख, रघुवीरसिंह चौहान, शिवा गंगुलवार, सुनील बास्टेवाड, अजय बोलमवार यांच्यासह गृहरक्षक दलाचे ६७ जवान, राज्य राखीव दलाचे ३० जवान व छत्रपती संभाजीनगर येथील २०-पोलीस अंमलदार हे पथसंंचालनात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker