माहूरचा दारुडा शिक्षक निलंबित : जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आदेश

New Bharat Times नेटवर्क
माहूर : तालुक्यातील शेकापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक अनंत रामचरण वर्मा यांचा दारुच्या नशेत गोंधळ घातलेला व्हिडीओ दि.5 डिसेंबर समाजमाध्यमातून व्हायरल झाला. त्यानंतर पुन्हा दि. 6 डिसेंबर रोजीही दारुच्या नशेत असल्याचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर वर्मा यांच्या निलंबनाचे आदेश दि. 8 डिसेंबर रोजी काढण्यात आले.
जि.प.के.प्रा.शा.शेकापुर माहूर ता. माहूर येथील प्राथमिक शिक्षक अनंत रामचरण वर्मा हे दि.5 रोजी शाळेमध्ये मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल असलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही दि.6 सदरील शिक्षक मद्य धुंद अवस्थेत असल्या बाबत गटशिक्षणाधिकारी माहूर यांनी अहवाल सादर केला. त्यामुळे अनंत रामचरण वर्मा प्राथमिक शिक्षक जि.प.के.प्रा.शा.शेकापुर के. माहूर ता.माहूर यांनी गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन करुन महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चे नियम 3 चा भंग केला आहे.
अनंत रामचरण वर्मा यांनी गैरवर्तन करुन महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चे नियम 3 चा भंग केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 चे नियम 3 नुसार आदेश निर्गमित दिनांक पासुन जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आल्याचे आदेश सोमवारी दि. 8 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
निलंबन काळात संबंधिताचे मुख्यालय शिक्षण विभाग (प्रा) जिल्हा परिषद नांदेड है राहील, निलंबन काळात त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहन अवधी, स्वीयेतर सेवा, आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतुन काढुन टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, 1981 चे नियम 68 (1) (ए) प्रमाणे अर्धवेतनी रजेवर असताना जेवढे वेतन व भत्ता मिळत होता तेवढा निलंबन भत्ता अनुज्ञेय राहील.
निलंबन काळात कोणताही खाजगी व्यवसाय करता येणार नाही तसे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुध्द नियमाप्रमाणे वेगळी शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेशाची नोंद संबंधिताच्या मुळ सेवापुस्तीकेत घेण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.



