ताज्या बातम्यानांदेडबिलोली
महाराष्ट्र नगर परिषद / नगर पंचायती व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या राज्य सल्लागार पदी सुभाष निरावार यांची निवड

कुंडलवाडी :- येथील नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक सुभाष निरावार यांची महाराष्ट्र नगर परिषद / नगर पंचायती व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. दि.२९ सप्टेंबर रोजी संघटनेच्या वतीने आयोजित सर्वसाधारण सभा व महा मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.तसेच संघटनेच्या जिल्हा उपाध्रक्षपदी हेमचंद्र वाघमारे यांची तर संघटनेच्या कुंडलवाडी शहराध्यक्ष पदी प्रकाश भोरे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी अनिल पवार, रामेश्वर वाघमारे, सतीश देशमुख, वैजनाथ स्वामी, साहेबराव मोरे, गणेश मदने, बालाजी मालसापुरे, शंकर जायेवार, मारोती करपे, मोहन कंपाळे आदी जण उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.