ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत इंजि.प्रशांत इंगोले यांनी केले जोरदार शक्ती प्रदर्शन

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार इंजी. प्रशांत इंगोले यांनी प्रचंड उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले यांना पक्षाने उमेदवारी बहाल केली. त्यानंतर आज इंजि. प्रशांत इंगोले यांनी प्रचंड रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा युवकांचे आयकॉन सुजाता आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज विविध पक्षांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इंजि.प्रशांत इंगोले यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडीच्या या रॅलीला शहरात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मतदारसंघातील हजारो मतदारानी व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीला प्रचंड प्रतिसाद दिला. ढोल ताशांच्या गजरात व घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रशांत इंगोले यांच्या उमेदवारीने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासह मतदारसंघातील मतदारात उत्साहाचे व चैत्यनाचे वातावरण पाहायला मिळाले.

विशेषतः युवा वर्गाकडून या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले. आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण विधानसभेचे उमेदवार तथा राज्य प्रवक्ते फारूक अहमद, भंते पैयाबोधी, युवा आघाडीचे राज्य सदस्य अक्षय बनसोडे, राज्य कार्यकारणी सदस्य तथा लोकसभा उमेदवार अविनाश भोसीकर, महासचिव श्याम कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते कैलास वाघमारे, महानगराध्यक्ष विठ्ठलदादा गायकवाड, आयुब खान पठाण.

महिला अध्यक्ष दैवशाला पांचाळ, निरंजना आवटेताई महानगराध्यक्ष चंद्रकला चाफळकर, महानगर महासचिव शेख बिलाल अमृत नरंगलकर, उत्तम धर्मकारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष भीमराव सूर्यवंशी, कौशल्याताई रणवीर, गयाताई कोकरे, कनिष्क सोनसळे, प्रभू सावंत सर अविनाश नाईक , राहुल सोनसळे, विश्वजीत सोनाळे, राहुल इंगोले, यांच्यासह यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची, मतदारांची यावेळी उपस्थिती होती.

सायंकाळच्या सुमारास युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते इंजिनिअर प्रशांत इंगोले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा निरीक्षक सर्वजित बनसोडे व मराठवाडा सदस्य डॉ.संघरत्न कुरे, शिवराज कोळीकर यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker