नायगाव शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगांवकर, सुभाषराव गोरठेकर आणि संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
नांदेड येथील चंद्रलोक हॉटेल दि. २२ ऑक्टोंबर रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विशेष बैठकीत हा प्रवेशद्वार सोहळा झाला.
यावेळी तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे, अशोक पवार यांची उपस्थिती होती. त्यात अविनाश पाटील कल्याण, भाऊसाहेब पा.कल्याण, नारायण पाटील शिंदे, सचिन वाघमारे, प्रशांत हटकर, गजानन कुंचलवाड, तिरुपती वडजे, सिद्धार्थ सोनवणे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शहरातील असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
नायगाव शहरातील तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष भगवानराव अलेगाकर, डी.बी जांभनुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर आदींनी त्यांचा सन्मान करीत पुढील पक्षीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.