ताज्या बातम्यानांदेडनायगांव

तिर्रट खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना कुंटूर पोलिसांनी पकडले

अंकुशकुमार देगावकर

नायगांव : कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांना चांगलाच ऊत आला असून. अवैध दारु सह मटका व जुगाराला पोलीसच पाठबळ देत आहेत. कुंटूर ठाण्याचे मुजोर ठाणेदार पाटील यांना वरिष्ठ अधिकारी बळ देत असल्याने माझे काहीही वाकडे होत नाही या अविर्भावात ते वावरत आहेत.

काल सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेनेतीन ठिकाणी कारवाई करुन अवैध दारु पकडली त्यामुळे कुंटूर पोलीसांचे पितळ उघडे पडले. त्यानंतर कुंटूर पोलिसांनी तत्परता दाखवत कुंटूर पासून काही अंतरावर रस्त्याच्या पुलाखाली तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना रात्रीच्या आठ वाजून दहा मिनिटांनी एकूण सहा जणांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून 52 पत्ते व एकूण पाच हजार 5940 रुपये जप्त करण्यात आले. सदर प्रकरणी अरुण सुधाकर झुंजारे, प्रवीण विठ्ठलराव शिंदे, सुधाकर देवराव होळकर, बालाजी ज्ञानोबा अडकिने अन्य आरोपी विरोध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोले यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker