भाजपाची सभा होणार असल्याने मराठा आंदोलकांना पोलिसांच्या नोटीस
अंकुशकुमार देगावकर
उमरी : आरक्षणाचे मारेकरी भाजप असल्याने भाजपाबद्दल मराठा समाजात तिव्र असंतोष आहे. आ. राजेश पवार यांच्या प्रचारासाठी उमरीत भाजपची दि. 12 रोजी सभा होणार आहे. त्यामुळे नायगाव तालुक्यातील मराठा युवक राजेश मोरे यांना उमरी पोलिसांनी नोटीस बजावली असून. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे. उमरी पोलिसांनी दिलेल्या नोटीसीमुळे मराठा तरुणात संतापाची लाट उसळली असून याचा फटका भाजपला बसणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे या मागील अनेक वर्षांपासून करत आहेत पण भाजपचे सरकार देण्यास तयार नाही त्यामुळे मराठा समाजाचा भाजपबद्दल संताप आहे. आरक्षणासाठी मराठा तरुणांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते त्यामुळे अनेक मराठा तरुणावर गुन्हेही दाखल झालेले आहेत.
त्याचबरोबर आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक भाजपच्या सभा उधळून लावत असल्याने भाजपमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते पोलीसांच्या आडून मराठा आंदोलकावर दबाव आणण्याचे काम करत असून. नायगाव तालुक्यातील देगाव येथील मराठा आंदोलक राजेश मोरे यांना उमरी पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
सदर नोटीस मध्ये १२ नोव्हेंबर रोजी उमरी शहरातील मोंढा मैदान उमरी येथील भाजप उमेदवार राजेश पवार यांच्या जाहीर प्रचार सभेदरम्यान काही अनुचित प्रकार घडणार नाही. या अनुषंगाने आयोजीत करण्यात आलेले कार्यक्रम शांततेत पार पाडावेत. जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांच्या आदशान्वये जिल्हयात जमाव बंदी आदेश लागू आहेत. मोठा जनसमुदाय जमा झाल्यानंतर त्या दरम्यान आपल्या कडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील. संपूर्ण कार्यक्रम होत असताना आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे तंतोतंत पालन करावे. आपल्याकडून किंवा इतर लोकांकडून कायदा व सव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरुन प्रचलीत कायदयान्वये कायदेशिर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची तंबी नोटीसमध्ये देण्यात आली.
मराठा आरक्षण भाजप विरोधी संतापाचे तीव्र पडसाद
या नोटीसने उमरी तालुक्यातील मराठा आंदोलककांच्या भावना ढवळून निघाल्या आहेत. या आधीच राज्यात मराठा समाजात शासन विरोधी प्रचंड नैराश्य आहे, अशात अशा प्रकारे एकाचा मराठा तरुणावर ठपका ठेवण्याच्या नोटीसिने मराठा समाजात भाजप विरोधी संतापाचे तीव्र पडसाद व रोषाच्या प्रतिक्रिया उमरी तालुक्यातील मराठा समाज माध्यामातून पुढे येत आहेत.
आ.राजेश पवार यांच्या प्रचारार्थ उमरी येथे आयोजित सभेसाठी मराठा आंदोलकांचा रोषाची तीव्रता कमी करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करीत देगाव येथील युवक राजेश मोरे यांच्यावर भविष्यातील मराठा गोंधळाचे ठपके ठेवत उमरी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सदर नोटीस मध्ये १२नोव्हेंबर रोजी प्रॉपर उमरी शहरातील मोंढा मैदान उमरी येथील भाजप उमेदवार राजेश पवार यांच्या जाहीर प्रचार सभेदरम्यान काही अनुचित प्रकार घडणार नाही. या अनुषंगाने आयोजीत करण्यात आलेले कार्यक्रम शांततेत पार पाडावेत.
जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांच्या आदशान्वये जिल्हयात जमाव बंदी आदेश लागू आहेत. मोठा जनसमुदाय जमा झाल्यानंतर त्या दरम्यान आपल्या कडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील. संपूर्ण कार्यक्रम होत असताना आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे तंतोतंत पालन करावे. आपल्याकडून किंवा इतर लोकांकडून कायदा व सव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरुन प्रचलीत कायदयान्वये कायदेशिर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची तंबी नोटीसमध्ये देण्यात आली.
मराठा आरक्षण भाजप विरोधी संतापाचे तीव्र पडसाद…
या नोटीसने उमरी तालुक्यातील मराठा आंदोलककांच्या भावना ढवळून निघाल्या आहेत. या आधीच राज्यात मराठा समाजात शासन विरोधी प्रचंड नैराश्य आहे, अशात अशा प्रकारे एकाचा मराठा तरुणावर ठपका ठेवण्याच्या नोटीसिने मराठा समाजात भाजप विरोधी संतापाचे तीव्र पडसाद व रोषाच्या प्रतिक्रिया उमरी तालुक्यातील मराठा समाज माध्यामातून पुढे येत आहेत.