भाजपाच्या खोट्या भूलथापांना बळी न पडता काँग्रेसउमेदवारानाच विजयी करा – भास्करराव पाटील खतगावकर
मोरे मनोहर
किनाळा :- भाजप सरकारला जर लाडक्या बहिणीचा इतका पुळका होता तर ते सत्तेत आल्याबरोबर हि योजना सुरू का केली नाही त्यांनी फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणींना दाखवलेले हे अमिश आहे परंतु काँग्रेस पक्ष सत्तेत येण्याअगोदर आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचा आणि विविध विकास कामांचा वचननामा दिला असून राज्यासह केंद्रातले भाजपचे दुसऱ्याच्या कुबड्यावर असणारे सरकार पडणार आहे यासाठी भाजपच्या कोणत्याही भुलधापाना बळी न पडता काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी शंकरनगर येथे केले.
नांदेड लोकसभेच्या होउ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा.रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण आणि नायगाव विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात डॉ.मिनलताई निरंजन पाटील खतगावकर व भास्करराव पाटील खतगावकर यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघातून निवृत्ती दादा कांबळे सांगवीकर हे पक्षाकडून निवडणूक लढवत असल्याने त्यांच्या विजयासाठी आयोजित करण्यात आली होती.
प्रचार सभेच्या कार्यकर्ता बैठकीत शंकरनगर तालुका बिलोली येथे भास्कर रावजी पाटील खतगावकर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनात कोणताही किंतु पंतु न आणता सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे असे दादांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याने कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचा शब्द दादा समोर अनेकांनी दिला.
यावेळी दशरथराव लोहबंदे, भिमराव जेठे, देगलूर बिलोली विधानसभेचे उमेदवार निवृत्ती दादा कांबळे सांगविकर, माधवदादा वाघमारे, पटाईत, देसाई, गौस भाई रामतीर्थकर यांनी आपले विचार व्यक्त करताना काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी दादा तुम्ही फक्त आशीर्वाद द्या हि निवडणुकीची लढाई आम्ही सहज जिंकू असा विश्वास दिला.
देगलूर बिलोली राखीव असलेल्या विधानसभेत मतदार संघातून बौद्धांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात असताना या मागणीची दखल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घेऊन मतदार संघातील स्थानिक उमेदवार निवृत्तीदादा कांबळे यांना उमेदवारी दिल्याने बौद्ध समाजातुनही मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षांना पाठिंबा दिला जात असल्याने होऊ घातलेल्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.
असा विश्वास सामान्य मतदारातूनही आता बोलले जात असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारनार हे आज सांगता येत नसले तरी आजपर्यंत भास्कररावजी पाटील खतगावकर हे ज्या उमेदवारांना आपला आशीर्वाद दिला तोच उमेदवार आमदार झालेला आहे हे मात्र कोणालाही विसरून चालणार नाही हे मात्र नक्की असल्याने देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघात दादांच्या छत्र छायेखाली निवडून आलेले जितेश रावसाहेब अंतापुरकर आणि सुभाष साबणे हेच आता दादाना सोडून निवडणूक लढवत असल्याने त्यांना ही निवडणूक चांगलीच अडचणीची ठरणार असल्याचे दिसून येत आहे.