सत्यअसणारी घटना पत्रकारांनी निर्भीडपणे लिहिलेच पाहिजे – सपोनि श्रीधर जगताप

किनाळा (मोरे मनोहर) :- सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या बातमीपेक्षा प्रिंट मीडियाच्या बातमीवर आजही मोठ्या प्रमाणात जनतेची विश्वासार्हता असून या विश्वासार्हतेला कुठेही तडा जाऊ न देता व्हाट्सअप फेसबुक वर येणाऱ्या बातमीची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांनी पत्रकारिता करत असताना कोणाच्याही आणि कसल्याही दबावाला बळी न पडता वास्तव सत्य असलेली घटना पत्रकारांनी लिहिलीच पाहिजे असे मत रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीधर जगताप यांनी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना आपले मत व्यक्त केले.
रामतीर्थ पोलीस ठाण्यात पत्रकार दिनाच्या निमित्ताने सपोनि श्रीधर जगताप यांच्या नेतृत्वाखाली नायगाव तालुका पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांचे डायरी,पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सपोनि श्रीधर जगताप पुढे बोलताना म्हणाले की एखादी घटना घडल्याची आइकिव माहिती असेल तर उशीर झाला तर चालेल परंतु त्या घटनेची सत्यता तपासल्याशिवाय बातमी देऊ नये कारण पत्रकार हा समाजाचा आरसा आहे असे सांगताना पत्रकारांनी वाईटच घटनेकडे न पाहता समाजात घडणाऱ्या चांगल्या घटनाही लिहिल्या पाहिजे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झालेले जांभळीकर, पत्रकार मनोहर मोरे, शेषेराव कंधारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकार मनोहर मोरे, यशवंत मोरे, हनमंत पाटील वाडेकर, आनंद पाटील डाकोरे, पप्पू पाटील तोडे, शेषेराव कंधारे, गोविंद टोकलवाड, तानाजी शेळगावकर, सत्तार इनामदार अशोक पाटील, मारुती सूर्यवंशी, शेख गौस, गौतम वाघमारे, भास्कर भेदेकर, गणेश कंदुरके, गंगाधर कांबळे, देविदास सूर्यवंशी अनेक पत्रकार व पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.