ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कै.मधुकरावजी पाटील खतगावकर यांच्या स्मरणार्थ शंकरनगर येथे क्रिकेट स्पर्धा सुरू

किनाळा (मोरे मनोहर) :- साई शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती कै. मधुकररावजी पाटील खतगावकर यांच्या चौथ्या पुण्यस्मनार्थ दि.6 जानेवारी रोजी शंकरनगर येथे २०२५ चे एम. पी.एल.चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन गोदावरी मनार पब्लिक स्कूलचे प्राचार्य डी.पी.पांडेय यांच्या हस्ते करण्यात आले तर या प्रसंगी ह. भ. प. शितलताई साबळे अहिल्यानगर यांचा कीर्तन सोहळा राज्याचे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.मधुकररावजी पाटील खतगावकर यांच्या खतगाव येथील समाधीस्थळावर खतगावकर कुटुंबीय अभिवादन केले. यानंतर शंकरनगर तालुका बिलोली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ह.भ.प. शितलताई साबळे अहिल्यानगर यांचा किर्तन सोहळा संपन्न झाला या वेळी ह.भ.प.शितलताई साबळे यांनी आपल्या वाणीतून भास्कररावजी पाटील खतगावकर हे मोठ्या बंधुचे पुण्यस्मरण करतात आपल्या मोठ्या बंधुत वडीलांची छबी असते त्यांची सेवा करावी आणि खतगावकरांचा हा आदर्श आपण हि घ्यावा असे आव्हान केले.

यावेळी प.पू.१००८ महंत यदुबन गुरू गंभीरबन महाराज, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, आमदार जितेश अंतापुरकर, हणमंतराव चव्हाण, केशव पाटील चव्हाण, खरेदी विक्री संघ अध्यक्ष नायगाव श्रीनिवास पाटील चव्हाण, नागोराव रोषनगावकर, उपनगराध्यक्ष नायगाव विजय पाटील चव्हाण, माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, बिलोलीचे माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे, बाळासाहेब पाटील खतगावकर, माजी उपमहापौर सरजितसिंग गिल, गणेशराव करखेलिकर.

माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण, डॉ.अनंत पाटील खतगावकर, माजी सभापती संजय बेळगे, वैजनाथ जाधव, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष भास्कर भिलवंडे, अरुण पाटील, मंगल देशमुख, शिवाजी पाचपिंपळीकर, राजू बोळसेकर, दीपक पावडे, आशिष पाटील, प्रमोद पाटील, सभापती रवी पाटील खतगावकर, निवृत्ती कांबळे, अतुल पाटील, सभापती बाबाराव भाले, दत्तहारी पाटील कावलगुडेकर, ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख, नंदू पाटील, प्रताप पाटील जिगळेकर, शिवाजी कुष्णुरकर, उपसभापती आनंदराव बिराजदार गुरुजी, एकनाथ वडगावकर, शंकर यंकम, हजाप्पा पाटील, रामतीर्थ नगरिचे सरपंच प्रतिनिधी हाणमंतराव पाटील तोडे, आनंदराव शिंदे.

मारोती दगडे, बालाजी माळेगावे, श्याम चोंडे, साहेबराव जाधव, माधव वाघमारे, नईम मोमीन, माधव वाघमारे, सदशिव डाकोरे,गंगाधर हिंगणीकर, अंबादास शिनगारे, एन.डी.पवार, दिलीप पांढरे, जयराम पाटील बाभळीकर, यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य आणि पंचक्रोशीतील गावकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खतगावकर कुटुंबीयावर प्रेम करणाऱ्या सर्व उपस्थितांचे डॉ.मीनलताई पाटील खतगावकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker