चिलपिंपरी गावात नांदेड प्लॉगर्स तर्फे प्लास्टिक वापरा बाबत जनजागृती अभियान
राहुल कोलते
मुदखेड :- आज दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी “टीम नांदेड प्लॉगर्स ” ने “जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिलपिंपरी ता. मुदखेड” येथील प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान आणि स्वच्छ्ता मोहिमेच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून प्लास्टिक मुक्ती अभियानात शाळा व गावकऱ्यांच्या वतीने आयोजित प्रभातफेरी मध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती आणि मार्गदर्शन केले.
चिलपिंपरी गावची जिल्हापरिषद शाळा म्हणजे अनुशासित, शिस्तबध्द आणि स्वच्छ तसेच निसर्ग सौंदर्य लाभलेला रम्य परिसर, कधीकाळी हीच शाळा ही अत्यंत खराब अवस्थेत होती परंतू येथे कार्यरत शिक्षक आणि गावकऱ्यांनी मिळून या शाळेचा कायापालट केला आणि एक सुंदर जिल्हा परिषद शाळेचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं. अत्यंत नयनरम्य वातावरण, दूरदर्शी शिक्षकवृंद आणि मेहनती कर्मचारी, त्यांच्या विश्वासावर खरे उतरणारे जिज्ञासू, हुशार विद्यार्थी आणि जबाबदार गावकरी असं हे गाव.
जर खरच बदल घडविण्याची इच्छा असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर अशक्य ते साध्य करण्यास कुणीच थांबवू शकत नाही हे या शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याकडे पाहून समजते. नुर सर यांनी ही संधी दिली त्याबद्दल सरांचे खूप खुप आभार. नूर सरांनी घेतलेल्या या कठोर मेहनतीला खरोखरच यश लाभले आहे. त्यांनी त्यांची शाळाच नाही तर संपूर्ण गाव प्लास्टिक मुक्त करण्याचा चंग बांधला आहे.
या कार्यक्रमाला उपस्थिती आदरणीय मुख्याध्यापक श्री चंद्रकांत घोडगे सर, ज्येष्ठ शिक्षक यशवंत महाजन सर, उपक्रमशील शिक्षक विष्णुकांत शिंदे सर, नांदेड प्लॉगर्स तर्फे अबोली ढवळे, सृष्टी मस्के, तेजस नाईक, गोविंद पाटील, इंद्रजीत जाधव, करण हिंगोले, पत्रकार राहुल कोलते, आनंदा गाढे, बालाजी गाढे, रामचंद्र गाढे तसेच गावातील सर्वच शिक्षणप्रेमी नागरिक वडीलधाडी मंडळी महिला पुरुष सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले सर्वांचे हार्दिक अभिनंदन.