वेगवेगळ्या दोन फायनान्स कंपनीच्या एजंटला रस्त्यात अडवून चाकु हल्ला करून दिड लाख लुटले
पोटाला जबर मार लागल्याने एजंटला पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे
शेषेराव कंधारे
नायगाव :- बी.एस.एस फायनान्स कंपनीचे एजंट रामदास कबिर हा मुखेड तालुक्यातील धमनगाव गावातून वसुली करुन बेटमोगरा मार्ग शंकरनगर कडे मोटरसायकल क्र.जि.जे. ०५ पि. क्यु. ४०५५ वरुन येत असताना रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या टाकळी बु गावा जवळ फायनान्स कंपनीच्या एजंटला ३ जणांनी दुचाकी आडवी लावून चाकूने हल्ला करून ४० हजारांची बग पळवले तर दुसऱ्या घटनेत नायगाव तालुक्यातील शेळगावकर गौरी गावातून स्वतंत्र फायनान्स कंपनीच्या एजंटला वसुली करून मोटरसायकल क्र. एम. एच. २६ सी. ७०६० वरुण शंकरनगर मार्गे नरसी येणाऱ्या फायनान्स कंपनीच्या चंद्रमुनी धुतटे या एजंटला नांदेड – देगलूर राज्य महामार्गावरील धुप्पा ता. नायगाव येथील ३२ के.व्ही विदुत केंद्राजवळ ३ जणांनी दुचाकी आडवी लावून चाकूचा धाक दाखवून एक लाखाहून अधिक रक्कम लुटल्याची घटना बुधवारी दि. ८ जानेवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.
‘बी.एस.एस.’या फायनान्स कंपनीचे एजंट रामदास कबिर रा.पिर सावरगा यांना चाकूने पोटात माडील व हातावर जबर मारहाण करुन रक्तबंबाळ केलेल्याने जखमी एजंटवर रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून नांदेड येथे उपचारसाठी पाठविण्यात आले आहे.
रामदास कबिर (२१) हा ‘बी एस एस’ या फायनान्स कंपनीत काम करतो. कंपनी ग्रामीण भागात कर्ज वाटप करते. रामदास नेहमीप्रमाणे धमनगाव व परिसरात कर्ज वसुलीचा हप्ता संकलनासाठी बुधवारी सकाळी गेला होता. वसुलीनंतर बेटमोगरामार्गे शंकरनगर कडे तो परत निघाला.
दरम्यान, अर्धा रस्त्यात बाईकवरून आलेल्या तीन जणांनी त्याचा रस्ता आडवला. यानंतर दोघांनी रामदास कबिर यांना चाकु दाखवून पैशाची बॅग हिसकावून घेत असताना रामदास देत नसल्याने एकाने चाकूने पोटात पायावर व हातावर सपासप वार करून रामदास कबिर यांना रक्तबंबाळ करून त्याच्या जवळील ३८ ते ४० हजार रूपये घेऊन पोबरा केला आहे. गंभीर जखमी झालेल्या रामदासला प्रवास्यांनी रामतीर्थ प्राथमिक आरोग्य दवाखान्यात दाखल केले.
मात्र पोटात व पायाला जबर मार लागल्याने रक्त स्त्राव थाबत नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे तर दुसऱ्या घटनेत चंद्रमुनी धुतटे ( २१ ) हा ‘स्वतंत्र’ या फायनान्स कंपनीत काम करतो. कंपनी ग्रामीण भागात कर्ज वाटप करते. चंद्रमुनी नेहमीप्रमाणे नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी येथे कर्ज वसुलीचा हप्ता संकलनासाठी बुधवारी सकाळी गेला होता.
वसुलीनंतर धुप्पा मार्गे नरसी कडे तो परत निघाला. दरम्यान, राज्य महामार्ग वरील धुप्पा येथील ३२ के.व्ही विदुत केद्रा जवळ रस्त्यात बाईकवरून आलेल्या तीन जणांनी त्याचा रस्ता आडवला. यानंतर दोघांनी चंद्रमुनी धुतटे यांना चाकु दाखवून त्याच्या जवळील १ लाख ५ हजार ४५० रूपये घेऊन पोबरा केला आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची रामतीर्थ पोलीसात अद्याप नोंद करण्यात आली नव्हती.