पोलिसांच्या डोक्यावरील हेल्मेट अन् काठीने वेधले शहरवासीयांचे लक्ष ◆कुंडलवाडी शहरात पोलिसांचे पथसंचलन


कुंडलवाडी :- श्री गणेशोत्सव व ईद -ए- मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कुंडलवाडी पोलिस स्टेशनच्यावतीने पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दि.१४ सप्टेंबर रोजी सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या डोक्यावरील हेल्मेट, हातातील काठीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
हिंदू बांधवांकडून ७ तारखेपासून गणेशोत्सव तर मुस्लीम बांधवांकडून २१ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद सण साजरा केला जाणार आहे. कुंडलवाडी शहरात कायदा व शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपत्ते यांच्या मार्गदर्शनात व कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वात दि.१४ सप्टेंबर रोजी पथसंचलन करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या डोक्यावरील हेल्मेट, हातातील काठीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, पोलीस कर्मचारी मिलिंद नरबाग, पी.आर.मेडेवार, रघुवीरसिंह चौहान, फैय्याज बेग, इद्रिस बेग, गणपत गंधकवाड, संजय चापलवार, महिला पोलीस कर्मचारी अरूणा श्रीवास्तव, शाईन शेख, दिपाली बागुलवाड यांच्यासह गृहरक्षक दलाचे जवान आदीजन या पथसंंचालनात सहभागी झाले होते.
दरम्यान, गणेशोत्सवासह येणाऱ्या काळातील सण, उत्सव शहर व पोलीस ठाण्यातील हद्दीतील नागरिकांनी शांततेत साजरे करावेत. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. उत्सवादरम्यान पोलिसांचीही करडी नजर राहणार असून, हुल्लडबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल,असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी दिला.