Uncategorized

कुंडलवाडी- धर्माबाद रोडवर अवैध वाळूचा हायवा पोलिसांनी पकडला

◆२५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ◆दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- कुंडलवाडी ते धर्माबाद रोडवर एम एस ई बी कार्यालयासमोर सार्वजनिक रोडवर अवैध वाळू वाहतुक करणारा हायवा कुंडलवाडी पोलिसांनी पकडला असून या कारवाईत २५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हायवा चालक व मालका विरूद्ध कुंडलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हि कारवाई दि.५ मार्च रोजी पहाटे ३:४५ वाजता करण्यात आली.

कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे,पोलीस कर्मचारी रघुवीरसिंह चौहाण, पिराजी मेडेवार, सुनील दस्तके, होमगार्ड सुनील रामपुरेयै हे पेट्रोलिंग करत असताना दि.५-मार्च रोजी पहाटे ३:४५ वाजता कुंडलवाडी ते धर्माबाद रोडवर एम एस ई बी कार्यालयासमोर सार्वजनिक रोडवर हायवा क्र.एम एच २६ बी ई १७७२ यास थांबवून चौकशी केली असता त्यात विनापरवाना रॉयल्टीविना बेकायदेशीररित्या लाल वाळूची शासनाचा कर बुडवून चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आला. या कारवाईत २५ लाख रुपयांचा हायवा व ३० हजार रुपयांची ६ ब्रास वाळू असा एकुण २५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात सपोनि ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक सदाशिव माधवराव गोरठकर (रा.सायाळ ता.भोकर) व हायवा मालक या दोन जणांविरुद्ध गु.र.नं.२४/२०२६ कलम ३०३(२),३(५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंडलवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध वाढू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker