कुंडलवाडी शहरात नायलन मांजा विकणा-या दुकानाची पोलीसांकडून तपासणी
◆सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक
कुंडलवाडी :- जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते यांनी नाईलान माजा साठवणे व विक्री करणा-यावर निर्बंध सबंधी मोहीम हाती घेवून कारवाई सत्र सुरू केले. त्याच अनुषंगाने कुंडलवाडी ठाण्याचे सपोनि.भागवत नागरगोजे ठाणे हद्दीतील जनरलस्टोअर व किराणा दुकानात बनावट ग्राहक पाठवून माजा विक्री दुकानाची झडती घेत जनजागृती केली.
पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्यानुसार पतंग उडविण्यासाठी लागणारा नाईलान माजाला शासनाने कायदेशीर बंदी घातली त्या अनुषंगानेच आज मकरसंक्रांती निमित्त कुंडलवाडी पोलिस ठिण्याचे प्रभारी सपोनि.भागवत नागरगोजे शहरातील चारते पाच जनरल स्टोर ला बनावट ग्राहक पाठवून प्रत्यक्ष भेट देऊन झाडती घेतली.नाईलान माजा विक्रिसाठी ठेवूनय असे सुचना दिले. आणि माज्याचे दुष्परिणाम आणि मानव जिवितहानी व पशुपक्षाचे जिवन धोक्यात येत असल्याचे काही उदाहरण देवून नाईलान माजा कोणीही विक्री करूनय जर कोणी विक्री करीत असले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कायद्याची माहिती देवून जनजागृती करण्यात आले.
यावेळी सपोनी.बि.टी.नागरगोजे, पोका.ईद्रीस बेग, राजेंद्र देशमुख उपस्थित होते. एकंदरीत नाईलान माजामुळे प्रत्येक वर्षी अनेक मानव जिव गमावले, त्यासह पशुपक्षांचे पण जिवितांचे नुकसान झाले.यासंदर्भात पोलिस प्रशासनतर्फे नाईलान माजा विक्री संदर्भात दुकानाची झडती व नागरीकात जनजागृती करण्यात येत असल्याने नागरीक सपोनि.भागवत नागरगोजे यांच्या कार्याची प्रशांसा व कौतुक करीत आहे.