ताज्या बातम्यानांदेडबिलोली

घरकुलधारकांना मोफत पाच ब्रास रेती व शेतकऱ्यांना पांदण रस्ता देणारच- गजानन शिंदे

मोरे मनोहर

किनाळा :- रामतीर्थ तालुका बिलोली येथे महसूल मंडळ रामतीर्थच्या वतीने रामतीर्थ सज्जाचे तलाठी विजय पाटील जाधव यांच्या वतीने 10 जून रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिलोली तालुक्याचे तहसीलदार श्री गजानन शिंदे हे उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना बिलोली तहसीलचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी तालुक्यातील सर्व घरकुलधारकांना मोफत पाच ब्रास रेती देण्यासाठी कसलीही अडचण नसून ती देण्यासाठी आम्ही तयार आहोत व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणारच यासाठी देखील लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवर मंडळीच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेनाप्रमुख बाबाराव पाटील रोकडे यांनी सामान्य जनतेचे लहान मोठे प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीची, गाय गोठ्याची, घरकुलाची, बिल काढण्यासाठी जो त्रास दिला जात आहे तो आपण त्रास कमी केला तर खऱ्या अर्थाने समाधान शिबिरातून समाधान होईल यासाठी शासनाने योग्य निर्णय घ्यावे.

अशी अपेक्षा व्यक्त केले. तर किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने यांनी शासनाकडूनच शेतकऱ्यांना पांदन रस्ता देण्यासाठी सहकार्य केले जात नाही अशी खंत व्यक्त करून शेतकऱ्यांना पांदण रस्ता तात्काळ उपलब्ध करून द्यावे अन्यथा यानंतर असे कोणतेही शिबिर घेऊ नये असे स्पष्ट यावेळी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनि श्रीधर जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव पाटील रोकडे, माजी पंचायत समितीचे सदस्य लक्ष्मण पाटील देगलूरे, सरपंच मनिषाताई तोडे उपसरपंच जयश्रीताई देगलूरे, चेअरमन शेषेराव पाटील रोकडे, हनमंतराव पाटील तोडे, संतोष पाटील भक्तापुरे, हिप्परगा माळ येथील सरपंच तिरुपती पाटील डाकोरे, किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने, आकाश कोकणे सरपंच चिटमोगरा, बिजूरचे पोलीस पाटील शिनगारे रामतीर्थचे पोलीस पाटील खुशालराव पाटील रोकडे, हिप्परग्याचे पोलीस पाटील जाधव, सुनील कांबळे ग्रामपंचायत सदस्य, गंगाधर कांबळे, आधीसह अनेक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजक रामतीर्थ सज्जाचे तलाठी विजय पाटील जाधव यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर, केरूळ सज्जाचे सध्याचे तलाठी सोनवणे, चीटमोगरा सज्जाचे सध्याचे तलाठी शिवाजी घोंगडे व काळे मॅडम व पाचपिपळी सज्जा चे तलाठी शहाणी सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तलाठी विजय पाटील जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी काळे मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker