ताज्या बातम्यानांदेडनायगांव

ह्रदय शस्त्रक्रिया केल्याचे बनावट कागदत्रे ; संवर्ग एक चा लाभ घेतलेल्या 13 शिक्षकांना जिल्हा परिषदेचा दणका

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी बदलीचा लाभ घेण्यासाठी बनावट दिव्यांगाचे प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच. जिल्ह्यातील 13 शिक्षकांनी ह्रदय शस्त्रक्रिया झाल्याचे कागदपत्रे सादर करुन बदलीचा लाभ किंवा बदलीतून सुट घेतली. सदर कागदपत्रे तपासणीत बनावट आढळून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या भामट्या शिक्षकांना सात दिवसात खुलासा सादर करण्यात यावा अन्यथा जिल्हा परिषद सेवा अधिनियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्या २०२५ मध्ये सोईच्या ठिकाणी बदली मिळावी किंवा बदलीतून सुट मिळावी यासाठी शेकडो शिक्षकांनी बनावट दिव्यांगाच्या प्रमाणपत्राचा वापर करुन लाभ घेतला. या प्रकरणी मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्याने विविध प्रकारचे प्रमाणपत्र सादर करुन संवर्ग एक चा लाभ घेतलेल्या शिक्षकांची पडताळणी करण्याचे आदेश दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आले होते.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी संयुक्तपणे कागदपत्रे पडताळणी मोहीम हाती घेतली. त्यामुळे या बोगस दिव्यांगाचे अक्षरशः धाबे दणाणले होते तर काहीजन राजकीय नेत्यांचे उंबरवठे झिजवून कारवाई टाळण्याचा प्रयत्न करत होते. परिणामी कागदपत्रे पडताळणीसाठी काही वेळ गेला पण संवर्ग एक चा लाभ घेतलेल्या काही महाभाग शिक्षकांनी चक्क ह्रदय शस्त्रक्रिया झाल्याची बाब पडताळणीत निष्पन्न झाले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकाऱ्यांनी दि. 4 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गणेश मोहनराव सिरमेवार प्रा.प.जि.प.हा.लहान ता.अर्धापूर जि.नांदेड, निलेश माधवराव आवर्दे स.शि.जि.प.प्रा.शा.उमरी ता.अर्धापूर जि.नांदेड, गंगाराम प्रभान्ना सबनेडवार स.शि.जि.प.प्रा.शा.वाघाळा ता.नांदेड जि.नांदेड, सुधाकर माणिकरेड्डी धर्माजी स.शि.जि.प.प्रा.शा.रुद्रापूर ता.बिलोली जि.नांदेड, श्रीमती फहीमुल्लाह सनाउल्ल्हा खान स.शि.जि.प.हा.मुलांचे किनवट ता.किनवट जि.नांदेड, संजय चंपतराव येरमे स.शि.जि.प.प्रा.शा. झेंडीगुडा ता.किनवट जि.नांदेड, सुरेश पंढरी मुन्नेश्वर स.शि.जि.प.प्रा.शा. भिलानाईक तांडा ता.किनवट जि. नांदेड, श्रीहरी दिगंबर मुंडे स.शि.जि.प.प्रा.शा.आनंदवाडी गोकुंदा ता.किनवट जि. नांदेड, श्रीमती सत्यभामा कळनुजी भगत स.शि. दुधगाव ता.किनवट जि.नांदेड, अशोक गुलाबसिंग चव्हाण स.शि.जि.प.प्रा.शा. भोजनी तलाव ता.माहूर, श्रीमती ज्योती अंगदराव अलकटवार स.शि.जि.प.प्रा.शा.नवी आबादी हदगाव ता.हदगाव जि.नांदेड, सदानंद मसनाजी मरकंटे प्रा.प.जि.प.प्रा.शा.नांदगाव ता. जि.नांदेड, बालासाहेब व्यंकटी डोके स.शि.जि.प.प्रा.शा.शिरड ता.हदगाव जि.नांदेड अदि शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

सदरच्या नोटीसमध्ये शासन निर्णयातील तरतुदीनुसार सन 2025 या वर्षीच्या प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. विशेष संवर्ग शिक्षक भाग 01 मधील तरतूद क्रमांक 1.8.3 – हदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक या संवर्गाचा लांभ घेवून आपण सन 2025 च्या बदलीमध्ये सहभाग नोंदवून बदलीमध्ये सूट अथवा बदलीचा लाभ घेतलेला आहे. त्यानुसार संदर्भक्रमांक 05 नुसार या कार्यालयाकडून आपली शारीरिक व वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली आहे. या पडताळणी मध्ये आपण लाभ घेतलेला संवर्ग व आपले वैद्यकीय कागदपत्र यामध्ये तफावत दिसून येत आहे. संदर्भ क्रमांक 01,02,03,04 मध्ये नमूद तरतुदीचे उल्लंघन करून आपण बदलीमध्ये चुकीचा लाभ घेतल्याचे प्रथम दर्शनी आढळून आलेले आहे.

वरील 13 शिक्षकांनी बदली पोर्टलवर-हदय शस्त्रक्रिया झालेली आहे असे नमूद करून विशेष संवर्ग शिक्षक भाग 01 चा लाभ घेवून शासन निर्णयातील नियमाचे उल्लंघन करून शासनाची दिशाभूल केलेली आहे. त्यांची ही कृती महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 चे कलम 3 चा भंग करणारी आहे असे सकृतदर्शनी दिसून येत आहे. करीता सदरील बाबीसाठी आपणास दोषी मानून बदलीमध्ये घेतलेला लाभ काढून का घेण्यात येवू नये ?

याबाबत आपला लेखी खुलासा पुराव्यासह सात दिवसाच्या आत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती संबंधित यांचे मार्फत गटशिक्षणाधिकारी यांच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह या कार्यालयात सादर करावा. खुलासा सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा अधिनियम 1964 (शिस्त व अपील) अन्वये, नियमानुसार योग्य ती शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

या कारणे दाखवा नोटीसीनंतर जिल्हा परिषद बोगसगिरी करणाऱ्या भामट्या शिक्षकांना आता सोडणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली या अतिशय संयमाने प्रकरण हाताळत असल्याने दणका बसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker