एकाच कुंटूंबातील चौघांचा मृत्यू ; मुदखेड तालुक्यातील घटना : अपघात का घातपात शोध लावण्याची जबाबदारी नांदेड पोलीसावर

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. यात दोन मुलांनी रेल्वेच्या समोर उडी मारुन आत्महत्या केली तर आईवडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुंटूंबातील चौघांच्या मृत्यूचे कारण काय याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलीसासमोर आहे.
गुरुवारी सकाळी नांदेड पासून जवळच असलेल्या मुगट रेल्वे स्थानक परिसरात उमेश रमेश लखे आणि बजरंग रमेश लखे या दोन युवकांचे मृत्यदेह सापडले. या मयतांची ओळख पटवण्यासाठी पोलीस यंत्रणेनी घर गाठले तर दोन युवकांचे वडील रमेश होनाजी लखे आणि आई वडील राधाबाई रमेश लखे या दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले होते. या घटनेमुळे पोलीस प्रशासन हादरून गेले.
मयत कुटुंब हे मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार या गावातील हे रहिवाशी असून, त्यांच्या घरात चार जणांचे कुटुंब होते. मानसिक विवंचनेतून किंवा कुठल्या कारणातून ही घटना घडली की घातपात आहे, याचा शोध पोलीस घेत असून, सबंध गावात या कुटुंबाबद्दल सहानुभूती असल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. उमेश लखे हे मुदखेड तालुक्यात मनसे तालुका उपाध्यक्ष आहेत सामाजिक कार्यात त्यांचे मोठे नाव आहे.
एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळे संशयाचे वातावरण तर निर्माण झालेच असून. पोलीस यंत्रणा या घटनेच्या किती मुळापर्यंत जावून गुढ उकलून काढते याकडे मुदखेड तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.



