ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे- सपोनी विक्रम हराळे

मोरे मनोहर

किनाळा :- गणेश उत्सव कार्यक्रम आणि पोळा सण या बरोबरच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणुकीबरोबर प्रत्येक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम शांततेत व सुरळीत पणे साजरे करून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी केले.

येणाऱ्या काळात श्री गणेश उत्सव बैलपोळा आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित करण्यात येणाऱे सर्व कार्यक्रम शांततेत व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले पाहिजे यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने रामतीर्थ पोलीस ठाण्यात दि.4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिलोली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शाम पानेगांवकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी पुढे बोलताना सपोनि हराळे म्हणाले की येणाऱ्या गणेश उत्सवाच्या काळात चालणाऱ्या अकरा दिवसाच्या कार्यक्रमात श्री गणेशाच्या स्थापनेपासून ते श्री गणेशाच्या विसर्जनापर्यंत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोणत्याही गावात कसलीही अडचण आली तर पोलीस स्टेशनला संपर्क करावा रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आपली समस्या सोडवण्यासाठी 24 तास तत्पर राहू असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिले.

या शांतता समितीच्या बैठकीस रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, जयंती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी याबरोबरच श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी याबरोबरच गावातील प्रतिष्ठित नागरिक व रामतीर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जांभळीकर यांनी केले तर उपस्थित आमचे आभार बेळीकर यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker