ताज्या बातम्यानांदेडनायगांव

गोदावरी मनार पब्लिक स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा…

मोरे मनोहर

किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूल व ज्यु.कॉलेज या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी रामतीर्थ व शंकरनगर गावामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत पारंपरिक आदिवासींच्या वेशभूषेत अनेक विद्यार्थी हे वेशभूषा, केशभूषा विविध महापुरुषांचे देखावे सादर करून सामाजिक संदेश देण्यात आला. जागतिक दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व, गायन, चित्रकला, एकांकिका, नृत्य स्पर्धा भाषण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले व विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदशनपर भाषणामध्ये आदिवासी हेच पृथ्वीचे मूळ निवासी आहेत कधी काळी निसर्ग पूजक असणारे आज सारेच सण उत्सव उत्साहाने साजरे करतात जर आपण मुळ निवासी या नात्याने विचार केला तर आपली संस्कृती अस्मिता समाजाचे अस्तित्व जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे आणि आपण ती जोपासली पाहिजे ही काळाची तितकीच गरज आहे एकलव्य आदिवासी जमातीतील असून त्याने जसे धनुर्विद्या मध्ये कसे सर्वश्रेष्ठ योगदान दिले ज्ञान संपादन केले तसेच विद्यार्थ्यांनी एकलव्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण आपलं नाव लौकिक करावे असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक सुनील दुबे यांनी केले.

याप्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सूर्यवंशी आर.के यांनी केले तर आभार जाधव श्यामसुंदर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker