रामतीर्थ सेवा सोसायटीवर खतगावकर गटाचे वर्चस्व कायम ; शेषराव रोकडे चेअरमन तर हानमंत वाडेकर यांची व्हाईस चेअरमन पदावर बिनविरोध निवड

शेषेराव कंधारे
नायगाव:- संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या रामतीर्थ सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडणुकीत खतगावकर गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत शेषराव रोकडे यांची चेअरमन तर हानमंत वाडेकर यांची व्हाईस चेअरमन पदावर बिनविरोध निवड झाली.
यापूर्वी झालेल्या निवडणुकीत संचालक मंडळ निवडून आले असले तरी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड न झाल्यामुळे प्रशासकाची नियुक्ती करावी लागली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्यातील नागरिकांचे विशेष लक्ष होते.

या वेळेस माजी मंत्री व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक शांततेत आणि बिनविरोध पार पडली. आनंदराव आप्पाराव पाटील रोकडे व संतोष व्यंकटराव पाटील पुय्यड यांच्या मध्यस्थीमुळे सुसंवाद साधून ही निवडणूक निर्विवाद झाली.
नवीन नेतृत्वाच्या निवडीवेळी सोसायटीचे सदस्य व्यंकटराव रामजी रोकडे, बाजीराव मारोतराव रोकडे, मधुकर आप्पाराव रोकडे, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य संतोष व्यंकटराव पुयड, मधुकर आप्पाराव रोकडे, शेषराव केरबा रोकडे, हनुमंत हौसाजी वाडेकर, प्रकाशराव रोकडे, जगदीश गणपतराव वाडेकर, सुधाकर पाचांळ, मंगलाबाई व्यंकटराव पुयड, निलाबाई धोडीबा रोकडे, पोर्णिमा गौतम भंडारे सह माजी सरपंच व्यंकटराव पा रोकडे, शिवाजी पा देगलूरे, माधवराव पा पुयड, राम पा देगलूरे, दिगंबर चंदने, दादाराव पा पुयड, आशोक पा रोकडे, बळवंत पा वाडेकर हानमंत देगलूरे, देविदास चंदने, राजेश रोकडे, बालाजी रोकडे,मारोती वाघमारे, सुनील काबळे,धोडीबा पा तोडे, गुनवंत देगलुरे, संजय पा पुयड, भगवान रोकडे, आनंद देगलूरे, विठ्ठल काबळे, फरीद शेख, गंगाधर संकटे आदीं अनेक मान्यवर उपस्थित होते.
या निवडीमुळे रामतीर्थ सेवा सहकारी सोसायटीच्या कारभारात स्थैर्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



