चिरली ते दिग्रस रस्त्यावर पडलेल्या हरिणाच्या पाडसाला तरुण शेतकऱ्यामुळे मिळाले जीवदान
◆ हरिणाच्या पाडसाला बिलोली वनविभागाच्या स्वाधीन केले

कुंडलवाडी :- चिरली ते दिग्रस रस्त्यावर पडलेल्या हरिणाच्या पाडसाला तरुण शेतकऱ्यांमुळे जीवदान मिळाले आहे. हरिणाच्या पाडसाला कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या उपस्थितीत बिलोली वन विभागाच्या स्वाधीन केले. ही घटना दि.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घडली.
शहरातील तरुण शेतकरी मारोती रामलु कोटलावार हे शेतीकडील कामे आटोपून आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कुंडलवाडी कडे चिरली ते दिग्रस रोडवर येत असताना त्यांना रस्त्याच्या मधोमध हरिनाचे पाडस पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ हरिणाच्या नर जातीच्या पाडसाला मोटरसायकलवर घेऊन डॉ.नरेश बोधनकर यांच्याकडे आणले असता डॉ.नरेश बदनकर यांनी हरिणाच्या पाडसाला प्राथमिक उपचार केले.
व ही माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे साहेब पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व बिलोली वनविभागाचे व्यंकटेश अंबुलगे यांना कळवली आता त्यांनी वनविभागाचे कर्मचारी सुनील गायकवाड, प्रकाश कांबळे, शेषराव इंगळे यांना हरिणाचे पाडस घेण्यासाठी पाठवले. दि.१९ सप्टेंबर रोजी रात्री ८-१५ वाजता वनविभागास हरिणाचे पाडस स्वाधीन करण्यात आले.
यावेळी डॉ.नरेश बोधनकर, शहर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कुणाल पवारे, पत्रकार दत्तूभाऊ हमंद, संतोष पाटील देगावे, करण समेटवार, साई येप्पुरवार, साई सुरनरे, माजीद शेख, पोलीस कर्मचारी आनंद बोडके नागराज तुंगेनवार आदीजण उपस्थित होते.



