निर्भीड पत्रकार धम्मदीप भद्रे यांचा वाढदिवस उत्साहात ; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सिमाताई आठवले, खा.डॉ.अजित गोपछडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून धम्मदीप भद्रे यांना शुभेच्छा

नांदेड : सामाजिक, पत्रकारिता आणि व्यापारी अशा तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, आठवले गट व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा निर्भीड पत्रकार धम्मदीप भद्रे यांचा वाढदिवस नुकताच नांदेड जिल्हाभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. राजकीय, सामाजिक, व्यापारी आणि पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
धम्मदीप भद्रे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असून, त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे जिल्ह्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार निर्माण झाला आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती, ज्यात प्रामुख्याने:
सिमाताई आठवले मॅडम (सौभाग्यवती, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले), डॉ.अजित गोपछडे (राज्यसभा खासदार), अबिनाश कुमार (पोलीस अधीक्षक), शिवानंद मीनगिरे (समाज कल्याण सहाय्यक आयुक्त), श्रावण पाटील भिलवंडे (भाजप नेते), तसेच प्रा.डॉ.मनोहर तोटरे, ज्येष्ठ पत्रकार गोविंद नरसीकर, माजी सरपंच बालाजी ईरेवाड, माधव पवार, दशरथ ईरेवाड, डॉ.धुपेकर आणि भीमराव भवरे यांसह अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे भद्रे यांना शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्याच्या विविध भागांत केक कापून, पुष्पगुच्छ देऊन आणि सत्कार समारंभांचे आयोजन करून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते. समाजासाठी निस्वार्थ भावनेने झटणाऱ्या धम्मदीप भद्रे यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा यावेळी सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आल्या.



