गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

नांदेड जिल्ह्यासाठी 553 कोटी मंजूर : आँगष्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : आँगष्ट महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुराने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी 553 कोटी 48 लाख 62 हजाराची निधी मंजूर केला असून. याबाबतच शासन निर्णय दि. 18 रोजी शासनाने काढला असून. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात एकूण ६ लाख ४८ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला होता. या नुकसानीपोटी जिल्ह्याला ५५३ कोटी निधीची गरज असल्याचा अहवाल नांदेड जिल्हा प्रशासनाने सादर केला होता. त्यानुसारच जिल्ह्याला ५५३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ७ लाख १२ हजार ६१० शेतकरी बाधित झाले होते.

जिल्ह्यात जिरायत पिकांचे ६ लाख ४६ हजार २१४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले तर १ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ४७६ हेक्टर क्षेत्रातील फळपिकेही या अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते. जिल्ह्यात १४ हजार ५ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसानही झाले आहे. यामध्ये ४ हजार १४६ हेक्टर क्षेत्र खरडून गेले आहे तर मातीचा थर, मलबा काढणे यासारखे नुकसान ७६० हेक्टर शेतीचे झाले आहे. यासाठीही जिल्हा प्रशासनाने २० कोटी ८१ लाखांची मागणी केली होती

राज्य शासनाने नांदेड जिल्ह्याला ५५३ कोटी ४८ लाख रुपये मदत देण्याबाबतचा शासनादेश १८ सप्टेंबर रोजी काढला आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हा निधी खर्च करताना शासन निर्णयातील सूचनांचे आणि निकषांचे काटेकोर पालन करण्यात यावे आणि ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करावा असेही स्पष्ट केले आहे.

मंजूर करण्यात आलेला निधी दि. २७.०३.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार, २ हेक्टर मर्यादेतील शेतीपिकांच्या नुकसानीचे आणि प्रती हेक्टर 8500 एवढी मदत मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker