कुंडलवाडी नगरपालिका साठी ७९.३८ टक्के मतदान ◆ नगराध्यक्ष च्या ४ उमेदवारासह सदस्य पदासाठीच्या ६२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष १९ जागेसाठी दि.२ डिसेंबर रोजी शहरातील १८ मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. १२१६३ मतदारांपैकी ९६५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदान ७९.३८ टक्के झाले आहे. कुंडलवाडी नगरपालिके च्या २० सदस्यांपैकी प्रभाग क्रमांक ३ (अ) यावर न्यायालयीन आक्षेप आल्याने निवडणूक आयोगाकडून प्रभाग क्रमांक ३(अ) ची निवडणूक पुढे ढकलण्यात आली.
त्यामुळे दि.२ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष पदासह १९ सदस्य पदासाठी शहरातील १८ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉ.विठ्ठलराव कुडमुलवार, भारतीय जनता पक्षातर्फे प्रेरणा कोटलावार व मिंधे गटाकडून डॉ.एस.एस.शेंगूलवार व अपक्ष म्हणून पठाण नजीरमियाँ मौलाना हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर १९ सदस्य पदासाठी ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
कुंडलवाडी नगरपालिकेसाठी शहरातील १८ मतदान केंद्रावर मतदान झाले. मतदान केंद्रावरील टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. जिल्हा परिषद कन्या शाळा कुंडलवाडी पूर्व बाजू वर्ग ६ वा ६८५ मतदारापैकी पैकी ५५९,जिल्हा परिषद कन्या शाळा कुंडलवाडी पूर्व बाजू वर्ग ७ वा ६८६ मतदारांपैकी पैकी ५१७, सांस्कृतिक सभागृह आंबेडकर नगर कुंडलवाडी १०२२ मतदारांपैकी ८४३, मिलिंद प्राथमिक शाळा कुंडलवाडी पश्चिम बाजू वर्ग ५ वा ब ५७५ मतदारांपैकी ४७८, मिलिंद प्राथमिक शाळा कुंडलवाडी वर्ग ५ अ ५७६ मतदारांपैकी ४७९, पशुवैद्यकीय दवाखाना कुंडलवाडी ५९५ मतदारांपैकी ५१, मिलिंद प्राथमिक शाळा कुंडलवाडी पूर्व बाजू वर्ग ७ वा अ ५९५ मतदारांपैकी ५०२, मिलिंद प्राथमिक शाळा कुंडलवाडी वर्ग ४ था ब ९६८ मतदारांपैकी ७६३.
जिल्हा परिषद उर्दू शाळा कुंडलवाडी दक्षिण वर्ग २ रा ६७४ मतदारांपैकी ५३४, जिल्हा परिषद उर्दू शाळा कुंडलवाडी पश्चिम बाजू वर्ग ७ वा ६७४ मतदारांपैकी ५४३, कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडी उत्तर बाजू कार्यालय ६७० मतदारांपैकी ५०९, कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडी दक्षिण बाजू सभागृह ६७१ मतदारांपैकी ५२१, नगरपालिका सांस्कृतिक सभागृह कुंडलवाडी जुने पोलीस स्टेशन ६५९ मतदारांपैकी ५२९, जिल्हा परिषद कन्या शाळा कुंडलवाडी पश्चिम बाजू वर्ग ८ वा ६५९ मतदारांपैकी ४९३, नगरपरिषद कार्यालय कुंडलवाडी आवक जावक कार्यालय ६२३ मतदारांपैकी ५१९, व नगरपालिका कार्यालय कुंडलवाडी सभागृह ६२३ मतदारांपैकी ४७३.
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कुंडलवाडी मीटिंग हाँल ६०४ मतदारांपैकी ४४२ व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कुंडलवाडी चेअरमन रूम ६०४ मतदारांपैकी ४४० इतके मतदान झाले आहे. शहरातील के.रामलू मंगल कार्यालयात दि.३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आता दि.२१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान शांततेत पार पडण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील १८ मतदान केंद्र व परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



