गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो – प्राचार्य डॉ.बलभीम वाघमारे

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नायगाव (बा.) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे परडवाडी, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी 2026 ते 01 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष वार्षिक सात दिवसीय शिबिराचा समारोप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बलभीम वाघमारे हे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी, “राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक, मानसिक व नैतिक असा सर्वांगीण विकास होतो. समाजाच्या विविध प्रश्नांशी थेट संपर्क आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, जबाबदारीची भावना व नेतृत्वगुण विकसित होतात,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गावचे माजी सरपंच श्री.हनुमंतराव पाटील वनाले, महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ.बालाजी गायकवाड, उपसरपंच प्रभु पाटील कौटकर, ग्रामपंचायत अधिकारी सदाशिव आगलावे, दशदथ पाटील कौटकर, संदीप पाटील परडे, वसंत पाटील परडे, रामराव पाटील बोरकर, मारोती पाटील वनाले, धोडीबा पाटील परडे, बालाजी पाटील कौटकर, हाणमंत पाटील परडे, शेषराव पाटील कराले याशिवाय आनंदा वाघमारे व मारोती वाघमारे हे उपस्थित होते.

सात दिवसीय शिबिरातील अनुभवांविषयी स्वयंसेवक विद्यार्थिनी कु.श्रद्धा वडजे, कु.वैशाली जुने तसेच स्वयंसेवक ओमसाई धसाडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या अनुभव कथनातून शिबिरादरम्यान मिळालेला सामाजिक अनुभव, श्रमदानाचे महत्त्व तसेच गावकऱ्यांशी निर्माण झालेला स्नेह प्रभावीपणे अधोरेखित झाला. माझी सरपंच हनुमंतराव पाटील यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने कु.मधुमती डांगे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस स्वयंसेविका कु. सुषमा सूर्यवंशी व कु.आकांक्षा बैलकवाड यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.मारोती एस.कदम यांनी सादर करून शिबिरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृती उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विशेष योगदानाबद्दल कु. नाझिया पठाण व कु.संजीवनी माने यांचा विशेष स्वयंसेवक म्हणून सत्कार करण्यात आला.

या विशेष वार्षिक शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. पी.डी.तावडे, नोडल अधिकारी प्रा.साईगणेश यादव, डॉ. सिद्धेश्वर राऊत तसेच सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. डॉ.गो.रा.परडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पाहुणे, ग्रामस्थ, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या समारोप कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शिबिरातील सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून स्वयंसेवकांना त्यांच्या भावी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker