कृषी दुकानदार सोमवारपासून बेमुदत संपावर : १४ प्रमुख मागण्यांसाठी कृषी विभागाला अल्टिमेटम

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक विक्री व्यवसायातील प्रलंबित अडचणींवर कृषी विभागाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नाईलाजास्तव तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रे दि. २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता वाढली आहे.
आठ दिवसांचा अल्टिमेटम
तालुका कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेच्या वतीने कृषी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, वरील सर्व अडचणी सोडविण्याचे पुढील आठ दिवसांत उचित निर्णय मंजूर व्हावेत, अन्यथा सोमवार दि. २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता मात्र शासनस्तरावर बेमुदत बंदची दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे नाईलाजास्तवसोमवार पासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.
गेल्या ४-५ वर्षांपासून पाठपुरावा
संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माणिकराव पा. भरकाड यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अडी अडचणी सुटाव्यात आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून गेली ४-५ वर्षे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, प्रधान सचिव (कृषी) व आयुक्त कृषी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु कृषी विभागाकडून ठोस कार्यवाही झालेली नाही अशी खंत यावेळी व्यक्त केली.
प्रमुख १४ मागण्या
- कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा करताना होणारे लिंकींग बंद करणे
- शेजारील राज्यातून येणारे अप्रमाणित HTBT कपाशी बियाणे प्रतिबंधित करणे
- प्रमाणित बियाण्यांसाठी ‘साथी पोर्टल’चा वापर विक्रेत्यावर सक्तीचा न करणे
- रासायनिक खतांचा पुरवठा FOR पद्धतीने करणे
- रासायनिक खतांचे विक्री मार्जिन वाढवणे
- सीलबंद पॅकिंगमध्ये बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्याला सॅम्पल फेल झाल्यास आरोपी न ठरवता साक्षीदार मानणे
- गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलची प्रलंबित रक्कम शासनाकडून विक्रेत्यास देणे
- तपासणी अधिकारी संख्या १५ वरून कमी करण्याबाबतची दि. २०/०६/२०२५ ची अधिसूचना कायम ठेवणे व वाढवणारी दि. ०६/०४/२०२६ ची सुधारणा रद्द करणे
- खरीप हंगाम २०२६ मधील युरिया व डीएपी खतांच्या वितरणाबाबतच्या परिपत्रकाचा फेरविचार करणे
- मुदतबाह्य किटकनाशके पुरवठादार कंपन्यांनी परत घेणे
- दुय्यम दर्जाची अवैध किटकनाशके, तणनाशके व बायो पेस्टीसाईड विक्रीस प्रतिबंध
- नवीन बियाणे कायदा २०२५ मधील विक्रेत्यांसाठी जाचक नियम शिथिल करणे
- नवीन किटकनाशके कायदा २०२५ मधील जाचक नियम शिथिल करणे
- हवामान बदलामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व काजू नुकसानीसाठी किटकनाशक विक्रेत्यांना जबाबदार न धरणे
नाराजीचा सूर
कृषी विभागाकडून ठोस निर्णय होत नसल्याने केंद्र चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता व नाराजीची भावना असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तालुक्यातील सर्व विक्री केंद्रे बेमुदत बंद राहतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
बेमुदत बंदच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील भरकाड, संगमनाथ कवटीकवार, दशरथ बच्चेवार, तिरुपती वडजे, प्रशांत पाटील, दिगांबर ताटे, शिवानंद वडजे,
अजय मोरे, नटेश्वर मुंके, बसवंत मुंके, बोयाळ, सुधाकर जवादवार, शाम शिंदे, भारत पाटील माहेगावकर, विनोद गंजेवार, माधव पडोळे, मोहन हंबर्डे, प्रविण मोरे, संजय बेलकर,



