ताज्या बातम्यानांदेडनायगांव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अन्नदान

New Bharat Times नेटवर्क

नायगाव : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हेडगेवार चौक नायगाव येथे सामाजिक कार्यकर्ते विशाल पंढरी भद्रे व भद्रे परीवार यांच्याकडून भव्य अन्नदान करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विजय पाटील चव्हाण साहेब (उपनगराध्यक्ष नगरपंचायत नायगाव) पंकज पाटील चव्हाण (नगरसेवक) संजय पाटील चव्हाण (नगराध्यक्ष प्रतिनिधी) शिवाजी पाटील कल्याण(नगरसेवक) विठ्ठल आप्पा बेळगे (नगरसेवक) माणिक पा.चव्हाण सूर्यकांत सोनखेडकर (पत्रकार) प्रभाकर लखपत्रेवार (पत्रकार).

पंडित वाघमारे (पत्रकार) नागोराव डुमणे प्रकाश हनुमंते (संपादक दलित कैवारी) मंगेश हनवटे (केंद्रप्रमुख) प्रा. दिलीप मोरे राजू भद्रे वाय.डी.डुमणे रा.णा.मेटकर भीमराव बैलके सुनील पोटफोडे सिद्धार्थ गायकवाड विजय सोंडारे रविंद्र दासवाड सुरज काळेवार मिलिंद बच्छाव रमेश भद्रे राहुल इंगळे बाबुराव झगडे प्रमोद घंटेवाड साईनाथ नामवाडे सचिन भद्रे विकी लोखंडे संकल्प जमदाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय पाटील चव्हाण यांनी सर्व जनतेस जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या हा उपक्रम अतिशय चांगला आहे असे गौरवोद्गार काढून विशाल भद्रे व भद्रे परीवार यांचे कौतुक केले. वरील सर्व उपस्थितांचे विशाल भद्रे यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker