ताज्या बातम्यानांदेडबिलोली

११२ क्रमांकावर खोटा कॉल करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यावर कुंडलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल!

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या ‘११२’ या हेल्पलाईन क्रमांकाचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात कुंडलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४:११ वाजताच्या सुमारास साईनाथ लालबा पालाक्रुतीवार (वय ५२ वर्षे, व्यवसाय: शेती, रा. नांदेड वेस, कुंडलवाडी) याने आपल्या मोबाईलवरून ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. कुंडलवाडी शहरातील बाजार लाईन येथे काही लोक मटका व जुगार खेळत असून तिथे मारहाण झाली आहे, अशी खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली.माहिती मिळताच कुंडलवाडी पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन खात्री केली, परंतु तिथे मटका, जुगार किंवा मारहाण असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले.

पोलिसांनी कॉल करणाऱ्या साईनाथ पालाक्रुतीवार याला समज दिली व पुन्हा असा खोटा कॉल न करण्यास सांगितले. तरीही, या व्यक्तीने पुन्हा दोन वेळा ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना खोटी माहिती दिली आणि पोलिसांची दिशाभूल करून वेळ वाया घालवला. या वारंवार केलेल्या गैरप्रकारामुळे अखेर कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ६५/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २१७ आणि २१२ अन्वये सदर इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११२ हा क्रमांक नागरिकांच्या आपत्कालीन मदतीसाठी आहे. या क्रमांकावर कोणीही खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ वाया घालवू नये आणि पोलिसांची दिशाभूल करू नये, असे आवाहन कुंडलवाडी पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker