ताज्या बातम्यानांदेडनायगांव

जुगार अड्ड्यावर छापा ; पाच जणांना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव तालुक्यातील सुजलेगाव शिवारात सुरू असलेल्या ‘तिर्रट’ नावाच्या जुगार अड्ड्यावर कुंटूर पोलिसांनी धडक कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, वाहनांसह एकूण ३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी कुंटूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना गुप्त बातमीदारामार्फत सुजलेगाव शिवारात काही इसम पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खात्री करून पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम २१ हजार ७०० रुपये, दोन दुचाकी व एक बुलेट वाहन किंमत २ लाख २० हजार रुपये, चार मोबाईल किंमत ७२ हजार रुपये तसेच जुगाराचे साहित्य, असा एकूण ३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रवीराज उत्तम जुकरे सुगाव ता. देगलूर, सुनील माधवराव उचे करे मलकापूर, ता. देगलूर), साईराज पी. रामकिशन कदम सुजलेगाव, ता. नायगाव, अभिषेक योगेश्वर हरगे (वय २७, रा. सुजलेगाव, ता. नायगाव व लक्ष्मण किशनराव तरकटे (वय ३३, रा. सुजलेगाव, ता. नायगाव यांचा समावेश आहे.

या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुरनं. २०३/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुंटूर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker