नगरसेवक पंकज पा.चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप

अंकुशकुमार देगांवकर
नायगाव :- नायगावचे युवा नगरसेवक पंकज पाटील चव्हाण यांनी या पारंपरिक चौकटीला छेद देत आपला वाढदिवस माणुसकीच्या सेवेला समर्पित करण्याचा संकल्प केला आहे. तालुक्यावर दुष्काळाचे सावट, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाण्याऐवजी चिंतेच्या रेषा आणि नापिकीच्या फटक्याने अनेक कुटुंबांवर आलेले दुःख पाहता, वाढदिवसाचा उत्सव समाजीक उपक्रमा सह शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच सामाजिक जाणिवेतून २९ सप्टेंबर रोजी महा-रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असलयाचे पंकज पा चव्हाण मित्र मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमाने नायगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात साजरा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. नायगाव नगरपंचायतीत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज बुलंद करणारे युवा नगरसेवक म्हणून पंकज चव्हाण यांची ओळख निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, गोरगरिबांच्या अडचणी असोत किंवा प्रशासनाच्या दारात न्यायासाठी द्यावी लागणारी हाक असो, त्यासाठी पुढाकार घेण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
स्व.खासदार वसंतराव चव्हाण यांच्या सामाजिक व राजकीय वारशाची प्रेरणा घेत, खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून तरुणाईला सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न पंकज चव्हाण करीत आहेत. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसाचा हा सामाजिक उपक्रम केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न राहता समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा संदेश देणारा उपक्रम ठरत आहे.
रक्ताचा प्रत्येक थेंब ठरेल जीवनदान दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर संकटाची छाया असताना, वाढदिवसाचा आनंद बाजूला ठेवून रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमाला प्राधान्य देण्यात आले आहे. रक्तदानाचा प्रत्येक थेंब एखाद्याचे प्राण वाचवू शकतो सामाजिक उपक्रम राबवून सामाजा मध्ये एक आगळं वेगळं जनतेचे प्रेम असल्यामुळे नवीन काहीतरी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या महा-रक्तदान शिबिरात तरुण कार्यकर्ते, रक्तदाते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन पंकज चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार फुलांनी नव्हे, तर रक्तदानातून माणुसकी जपून व्हावा; हीच पंकज चव्हाण मित्र मंडळाची भूमिका मांडली आहे.



