ताज्या बातम्यानांदेडनायगांव

भारतीय बौद्ध महासभा नायगाव तालुका शाखेच्या नूतन कार्यकारणीची घोषणा

New Bharat Times नेटवर्क

कुंटूर : बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार, सामाजिक प्रबोधन, धम्म संस्कार आणि समाजात एकोपा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा नायगाव तालुका शाखेची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती शाहू नगर, नायगाव येथील विश्वशांती बुद्ध विहारात २७ सप्टेंबर रोजी या नूतन कार्यकारणीची निवड प्रक्रिया पार पडली. हा कार्यक्रम नांदेड (दक्षिण) चे जिल्हाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य हौसाजी वारघडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष बी. डी. कांबळे सर, संस्कार उपाध्यक्ष पी. एम. वाघमारे सर, जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष संतोष दुंडे सर, संस्कार सचिव चंद्रकांत चौदंते सर, मेजर हरी कसबे सर, नायगाव विभागाचे जिल्हा संघटक अर्जुन चौदंते सर आणि देगलूर विभागाचे जिल्हा संघटक के. के. वाघमारे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

नायगाव तालुका नूतन कार्यकारणी :
अध्यक्ष : आयु. मालोजी भाऊराव झगडे, सरचिटणीस : आयु. रविकांत किशनराव हानमंते, कोषाध्यक्ष : आयु. सिद्धार्थ यशवंतराव सोनकांबळे
संस्कार उपाध्यक्ष : आयु.गौतम धोंडीबा जोंधळे, संस्कार सचिव : आयु. दयानंद व्यंकटी कांबळे, आयु. रावसाहेब खंडू कदम, संरक्षण उपाध्यक्ष : आयु. सुधाकर अंबाजी पवार, संरक्षण सचिव : आयु. संजय संभाजी गायकवाड, आयु.गोविंद विठ्ठल हानमंते, हिशोब तपासणीस : आयु. नागभूषण आनंदा वाघमारे

कार्यालयीन सचिव : आयु. अमोल सिताराम जोंधळे, पर्यटन उपाध्यक्ष : आयु. देविदास पुंडलिकराव राक्षसमारे, पर्यटन सचिव : आयु. नातेश बाबुराव कांबळे, आयु. माधव शंकरराव इंगळे

संघटक : आयु. संजय हनुमंतराव वालंबे, आयु. राहुल किशन पवार, आयु. भीमराव रोहिदास वाघमारे, आयु. निवृत्ती माणिक वाघमारे, आयु. रोहिदास संभाजी भद्रे, आयु. बालाजी लक्ष्मण हानमंते, आयु. अनिल कोंडीबा गायकांबळे

या निवड प्रक्रियेच्या वेळी नायगाव तालुक्यातील बौद्ध उपासकांचा आणि नागरिकांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या नूतन कार्यकारणीच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात धम्म प्रचार, संस्कार वर्ग, सामाजिक प्रबोधन व संघटन बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!