ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

जयवर्धन भोसीकर यांना न्यायचक्र पुरस्कार जाहिर ; पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याचा गौरव

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- लोक जनजागृती संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा न्याय चक्रपुरस्कार पत्रकार जयवर्धन भोसीकर यांना जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार शितळे यांनी भोसीकर यांच्या निवडीचे सन्मानपूर्वक पत्र देवून पुरस्कार वितरण कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्याचे निमंत्रण दिले.

पत्रकारितेच्या माध्यमातून मागील वीस वर्षापासून पत्रकार जयवर्धन भोसीकर प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या विविध संस्थांना मधून कार्य करत असताना सामाजिक दृष्ट्या वंचित, शोषितांना न्याय देण्याचे उल्लेखनीय कार्याची दखल घेत मानाचा न्यायचक्र गौरव पुरस्कार 2026 जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण 29 मार्च 2026 रोजी देवकृपा फंक्शन हॉल पूर्णा रोड नांदेड येथे लोक जनशक्ती पक्षाचे खा.अरुण भारती यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

जयवर्धन भोसीकर यांच्या पत्रकारितेतून सदैव त्यांनी अन्यायग्रस्त व पिढी त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.जयवर्धन भोसीकर यांना न्याय चक्र पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल दैनिक माहितीचे संपादक विनायक कामठेकर, सम्यक न्यूज लाईव्हचे विजय निलंगेकर, दैनिक एकजूटचे देशमुख, दैनिक नवभारतचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत गव्हाणे, पब्लिक ॲपचे राहूल साळवे यांच्यासह विविधस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker