ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव पोलीसांची जुगार अड्यावर धाड 12 जुगाऱ्यांना अटक 6 लाखाचा मुद्देमाल जप्त

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : रानसुगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर व्यंकटराव जाधव यांच्या तलबिड परिसरात असलेल्या शेतातील जुगार अड्यावर नायगाव पोलिसांनी धाड मारुन 12 जुगाऱ्यांना अटक केली. तर 1 लाख रोख रक्कमेसह 6 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई दि. 25 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान करण्यात आली आहे.

नायगाव तालुक्यातील तलबीड शिवारात ज्ञानेश्वर व्यंकटराव जाधव रानसुगाव यांचे शेतात मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून एक पथक तयार करुन आणि सोबत दोन पंच घेवून दि. 25 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान धाड मारण्यात आली. यावेळी शेख खादीर दस्तगीर रा. घुंगराळा तालुका नायगाव, गणपती गोविंदराव जाधव रा.सुगाव तालुका नायगाव, भगवान गणपती ढगे रा.सावरखेड तालुका नायगाव, माधव कोंडीबा सुगावे रा, घुंगराळा तालुका नायगाव, साईनाथ बाबू गायकवाड रा. सावरखेड तालुका नायगाव.

माणिका बळी वानखेडे रा. सावरखेड तालुका नायगाव, अविनाश प्रकाश माचनवाड रा, हंगरगा तालुका उमरी, शंकर गणपती देवडे, भाजी मार्केट इतवारा नांदेड, हनुमंत गंगाधर वानखेडे रा.सावरखेड तालुका नायगाव, नागोराव आनंदा गायकवाड रा.सावरखेड तालुका नायगाव, संजय शंकर बाणेवाड रा. घुंगराळा तालुका नायगाव व गणेश बालाजी पवळे राहणार कोपरा तालुका नायगाव अदि 12 जुगारी अंदर बाहेर नावाचा खेळत असताना दिसून आले.

अंदर बाहेर जुगार खेळणाऱ्या 12 जुगाऱ्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून 1 लाख 8 हजार 800 रुपयाची रोख रक्कम व 9 मोबाईल आणि पाच मोटारसायकली असा एकून 6 लाख 11 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कर्मचारी बालाजी बळवंतराव शिंदे यांच्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घुंगराळा येथील संजय शंकर बाणेवाड जुगारी असून तोच पोलीसांना सापडू नये यासाठी घुंगराळा परिसरासह कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोज जागा बदलून जुगार अड्डा चालवत होता. मात्र तो काल दि. 25 रोजी नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने नायगाव पोलिसांनी कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker