89 नायगाव विधानसभाताज्या बातम्यानांदेड

आ.राजेश पवार यांच्या सभेला नागरीकांनी फिरवली पाठ : ऐणवेळी सभा करावी लागली रद्द

प्रल्हाद हिवराळे

उमरी : भाजप पक्षाकडुन एका समाजाला संबोधित करुन मत प्रवृत्त करण्यासाठी समाजाचे भाजप पक्षातील नव्यानेच झालेल्या विधानपरिषदेच्या आमदारांना बोलावण्यात आले होते. परंतु ऐनवेळी यासभेला सभास्थळी नागरिकांनी पाठ फिरविल्याने सकाळी अकरा वाजताची सभा असताना तिन वाजेपर्यंत तालुक्यातील मतदारांनी पाठ फिरवल्याने ऐणवेळी सभा रद्द झाल्याची संयोजकांनी सांगितल्याने जमलेले मोजके मतदारांनी झालेल्या खिचडीवर ताव मारून माघारी परतले.

भाजपच्या पहिल्याच सभेला घडल्याने या पक्षाचे बुडते पाय खोलात दिसत असल्याचे तर्कवितर्क जनतेतुन दिसून येत आहे. ऐनवेळी सभा रद्द झाल्याने भाजपावर नामुस्कीची वेळ आल्यावर सध्या तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले.

भाजपाच्या सभेला संबोधित करणाऱ्यांना समाजातील जेष्ठ लोकांनी विरोध दर्शविला त्यामुळे त्यांचा अचानक दौरा रद्द झाला की त्यांनीच ऐनवेळी सभेला पाठ फिरवली. सध्यातरी भाजप पक्षाकडुन उमरी शहरात जाहिर सभा झाली नसून यांचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. ता. १२ रोजी होणाऱ्या कार्यक्रमास नेत्याचाही विरोध आहे की काय अशी चर्चा तालुक्यात होत आहे.

या सभेस मराठा बांधव अडचणीत आणतील या द्वेष भावनेतून शहरातील मराठा बांधवाना आरक्षण विषयी गोंधळ करतील आणि सभा उधळून टाकतील या भितीपोटी भाजप पक्षाच्या उमेदवाराने सभेच्या स्थळी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. मराठा आंदोलकांना उमरी पोलीसांकडून नोटिसा बजावण्यास भाग पाडले. तसे होणारी सभा ऐणवेळी बारगळी असल्याने. या समाजातील लोकांमध्ये भाजप पक्ष व आमदारांवर रोष व नाराजीचा सूर दिसून आल्याचे चिञ दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker